• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सर्वात मोठी बातमी! जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला

सर्वात मोठी बातमी! जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 11, 2026, 14:49 IST|Updated: Nov 11, 2026, 15:23 IST
joinshare
सर्वात मोठी बातमी! जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला
Image Credit: Jammu and Kashmir

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जम्मू आणि काश्मीरमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.  जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम इथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पथकावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 2 जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी परिसर सील केला आहे. तर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. 

 

#WATCH | J&K | Two CRPF personnel injured after unidentified motorcycle-borne assailants opened fire on security personnel deployed at a naka in Kulgam district this afternoon. The injured personnel were shifted to a hospital in Anantnag district for treatment. (Visuals from the area, deferred by unspecified time; no live operational details disclosed)

— ANI (@ANI) November 11, 2026

 

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 2:15 च्या सुमारास कुलगाम जिल्ह्यातील एका तपासणी नाक्यावर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. नाक्यावर तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा जवानांवर हा हल्ला करण्यात आला. बाइकवरून अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे सीआरपीएफ जवांनावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही जवानांनी हल्लेखोऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर ही हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान जखमी जवानांवर अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे. 

 

#WATCH | J&K | Two CRPF personnel injured after unidentified motorcycle-borne assailants opened fire on security personnel deployed at a naka in Kulgam district this afternoon. The injured personnel were shifted to a hospital in Anantnag district for treatment. (Visuals from the area, deferred by unspecified time; no live operational details disclosed)

— ANI (@ANI) November 11, 2026

 

दरम्यान गेल्या महिन्यात, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील अलारमादेगु कॅम्पमध्ये चार जवान जखमी झाले होते.  शिल्लक स्फोटकांची विल्हेवाट लावत असताना झालेल्या आयईडी स्फोटात हे जवान जखमी झाले होते. हे जवान सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या ॲम्युनिशन टेक्निशियन टीम (एटीटी) मधील होते. या टीमवर कोंटा रेंजमधील पिडमेल, डब्बाकोंटा, कोलाईगुडा आणि अलारमादेगु यांसारख्या कॅम्पची तपासणी करून, तेथे साठवलेल्या कोणत्याही शिल्लक किंवा संपलेल्या स्फोटकांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News