• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /आयर्लंडमध्ये व्हिसासाठी AI ची मदत घेणं भोवलं, तब्बल 3300 भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रिजेक्ट

आयर्लंडमध्ये व्हिसासाठी AI ची मदत घेणं भोवलं, तब्बल 3300 भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रिजेक्ट

Ireland Indian Students Visa : आयर्लंडसाठी विद्यार्थी व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या 3300 विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. या विद्यार्थ्यांनी व्हिसा अर्ज आणि पर्सनल स्टेटमेंट लिहिण्यासाठी चॅटजीपीटी सारख्या एआय टूल्सची मदत घेतल्याचं समोर आल्याने आयर्लंडच्या व्हिजा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Reported Bypooja pawar
Published: Oct 18, 2026, 01:22 PM IST|Updated: Oct 18, 2026, 02:06 PM IST
joinshare
आयर्लंडमध्ये व्हिसासाठी AI ची मदत घेणं भोवलं, तब्बल 3300 भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रिजेक्ट
Image Credit: आयर्लंडमध्ये व्हिसासाठी AI ची मदत घेणं भोवलं, तब्बल 3300 भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रिजेक्ट

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Ireland Indian Students Visa : परदेशात जाऊन शिकण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र अशा भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरवर वाईट प्रभाव पडल्याची माहिती समोर आली आहे. आयर्लंडसाठी विद्यार्थी व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ या कारणास्तव फेटाळले गेले की, कारण त्यांनी व्हिसा अर्ज आणि पर्सनल स्टेटमेंट लिहिण्यासाठी चॅटजीपीटी सारख्या एआय टूल्सची मदत घेतली होती.

5100 पैकी 3300 भारतीय विद्यार्थ्यांचा अर्ज रिजेक्ट :

ताज्या आकडेवारीनुसार यावर्षी आयर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी एकूण 5100 भारतीय विद्यार्थ्यांनी स्टुडंट व्हिजासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र जेव्हा आयरिश दूतावास आणि त्यांच्या व्हिसा अधिकाऱ्यांनी या अर्जांची बारकाईने तपासणी केली, तेव्हा एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले. एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे 3300 विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज पूर्णपणे फेटाळण्यात आले. याचा अर्थ असा की भारतीय अर्जदारांपैकी जवळपास 64 टक्के लोकांचे व्हिसा अर्ज सरसकट रद्द करण्यात आले कारण त्या अर्जांमधील मजकूर एआय द्वारे तयार करण्यात आला होता.

व्हिजा अधिकाऱ्यांनी कशी पकडली विद्याथ्यांची लबाडी?

आजकाल व्हिजा प्रोसेसिंग सिस्टमला आता खूपच आधुनिक आणि ऍडव्हान्स बनवलं गेलं आहे. परदेशी दूतावासांकडे एआय शोधणारी विशेष सॉफ्टवेअर आणि साधने असतात, ज्यांच्या मदतीने एखादा मजकूर माणसाने लिहिलेला आहे की संगणकाद्वारे आपोआप तयार केला गेला आहे, हे सहज ओळखता येते. जेव्हा व्हिसा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये एकसारखी भाषा, कृत्रिम शब्दरचना आणि लेखनाचे एकसमान नमुने आहेत, तेव्हा त्यांना त्वरित संशय आला. तेव्हा व्हिजा अधिकाऱ्यांचे असे मत झाले की एआयचा वापर करून लिहिलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थ्यांच्या खऱ्या भावना, मौलिकता आणि प्रामाणिकपणाचा अभाव होता.

परदेशात जाण्यासाठी किती गरजेचं आहे पर्सनल स्टेटमेंट?

कोणत्याही देशाचा व्हिजा मिळवण्यासाठी सबमिट केल्या जाणाऱ्या स्टेटमेंट ऑफ पर्पस एप्लिकेशन हे महत्वपूर्ण दस्तावेज असतं. ज्याच्या माध्यमातून परदेशातील सरकारला समजून घेण्यास मदत होते की विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात का यायचं आहे. विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच्या त्यांच्या योजनांच्या संदर्भात व्हिसा नियमांनुसार हे पत्र विद्यार्थ्याने स्वतःच्या भाषेत स्वतःच लिहिणे अनिवार्य आहे. मात्र स्वतः मेहनत घेण्याऐवजी अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी शॉर्टकटचा अवलंब करून संपूर्ण अर्ज AI कडून तयार करून घेतला. दूतावासाने याकडे फसवणुकीचा गंभीर प्रकार आणि आवश्यक ती काळजी न घेतल्याचे प्रकरण म्हणून पाहिले आणि याविरुद्ध कठोर भूमिका घेत त्यांनी हे व्हिसा अर्ज फेटाळून लावले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jobs News
Career News
Marathi News