SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बर्नर फेकलं, तवा उलटला अन्...; हॉटेल चालकाकडून वडिलांचा अपमान, बदला घेण्यासाठी दोन तरुणींचं भलतंच धाडस, Video Viral

वाराणसीत एक धक्कादायक घटना घडली असून दोन तरुणींनी डोसाचं दुकानात तोडफोड केली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 17, 2026, 10:47 IST | Updated: Nov 17, 2026, 10:48 IST
Image Credit: varanasi dosa shop viral video two girls vandalism cctv footage know reason
Join

उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील एका डोसाच्या दुकानात दोन तरुणींनी मोठा गोंधळ घातला. डोसाचे सामान जमिनीवर फेकून दिले, भांडी आदळली. हा सगळा गोंधळ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुलीनी घातलेल्या या गोंधळाचे कारणही फार आश्चर्यचकित करणारे आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेल्या अकाउंटवरुन हा दावा करण्यात आला आहे की, या दोन तरुणी बहिणी आहेत. तसंच, व्हिडिओत दिसतंय की,  पहिले स्कुटरवरुन दोघी बहिणी दुकानाबाहेर येतात. त्यानंतर दुकानात ठेवलेले सामान फेकण्यास सुरुवात करतात. अचानक झालेल्या या प्रकारामुळं दुकानातील कर्मचारीदेखील गोंधळले आहेत. तसंच, दुकानाबाहेर उभे असलेले ग्राहकाही काही काळासाठी धास्तावून उभे होते. तर दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या भेलुपूर येथे ही घटना घडली आहे. 4 नोव्हेंबर रोजी या तरुणींच्या वडिलांचा हॉटेल चालकासोबत वाद झाला होता. त्यानंतर तो वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर तरुणींच्या वडिलांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या विरोधात कुटुंबाने भेलूपू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. निराश झालेल्या या तरुणींनी अखेर हे प्रकरण स्वतःच्या हातात घेतले.

व्हिडिओत दिसतंय की, एक मुलगी स्कूटरवरून येऊन खानावळ आणि तिच्या आजूबाजूच्या परिसराचे चित्रीकरण सुरू करताना दिसत आहे. त्यांच्यापैकी एक जण अचानक त्या हॉटेलकडे धावते आणि पिठाने भरलेला एक डबा उलटवते. तसंच, डोशाचा तवा फेकून देताना दिसतेय. हा गोंधळ सुरू असताना दुकानात बसलेल्या महिला हे पाहून बाहेर पळून गेल्या. तर एका महिलेने या तरुणींना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिच्यासोबतही हुज्जत घातली.

दुकान चालकाचा आरोप आहे की, आम्ही या तरुणींना अडवल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर, दुकानातील काही सामान फेकण्यास हल्ला करण्यास सुरुवात केली. ज्यामुळं दुकानातील कर्मचारी व तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांना किरकोळ जखमा आल्यात.

घटनेनंतर, दुकानदाराने भेलूपूर पोलीस ठाण्यात जाऊन त्या दोन तरुणींवर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली आहे. दुकानदाराच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 352, 351(3), 115(2) आणि 324(4) अंतर्गत अज्ञात तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता त्या दोन तरुणींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES