SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मालक हवा तर असा! प्रत्येक कर्मचाऱ्याला 1 लाख रोख रुपये दिले, बंडल वाटतानाचा VIDEO व्हायरल

व्यापाऱ्याने आपण आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ कामगार न मानता, कुटुंबाचाच एक भाग मानत असल्याचं म्हटलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 12:42 IST | Updated: Nov 08, 2026, 12:48 IST
Image Credit: दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले 1 लाख रोख रुपये
Join

दिवाळीनिमित्त कंपन्या कंपन्यांमध्ये आनंद आणि दु:ख असं संमिश्र वातावरण असतं. काही ठिकाणी भरघोस बोनस मिळत असल्याने कर्मचारी प्रचंड आनंदात असतात, तर काही ठिकाणी हातात फक्त मिठाईचा बॉक्स पडत असल्याने नाराजीही असते. अशावेळी ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांवर बोनस अक्षरश: ओवाळून टाकतात त्यांची चर्चा होणं साहजिक आहे, दरम्यान असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मालक कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपये रोख देत आहे.

कोण आहे हा मालक?

सूरतमधील कापड व्यापारी रामस्वरुप मुंडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भरघोस बोनस दिल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. अनेक कंपन्या दिवाळीच्या निमित्ताने मिठाई किंवा सुक्या मेव्याचे बॉक्स भेट म्हणून देतात, परंतु गुजरातमधील व्यापारी केंद्र असलेल्या सुरतमध्ये कापड व्यवसाय चालवणाऱ्या रामस्वरूप मुंडे यांनी आपल्या 20 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम देत आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी ही रोख रक्कम पाकिटांतून न देता, पूजेच्या थाळीत नोटांची जुडी सजवून कर्मचाऱ्यांना दिली.

व्यापाऱ्याच्या पत्नीच्या हस्ते ही 1 लाखांहून अधिक रकमेची भेट देण्यात आली. या अनोख्या भेटीमुळे कर्मचारीही भारावून गेले होते. कर्मचाऱ्यांना ज्याप्रकारे बोनस देण्यात आला त्याने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं. 10 ते 500 रुपयांच्या नोटांची जुडीच्या जुडी ताटांमध्ये अतिशय नीटनेटकी मांडून ठेवण्यात आली होती. यादरम्यान काही कर्मचाऱ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या आणि डोळ्यात पाणी आले.

 

 

नेमकी भावना काय?

आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना मुंडे म्हणाले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ दुकानातील कामगार न मानता, आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानतात. त्यांची इच्छा होती की, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी.

बोनस वाटपाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्स या व्यावसायिकाचे कौतुक करत आहेत, तर काहींनी अशा मालकाकडे काम करणे किती भाग्याचे असेल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

"त्यांचे तत्त्वज्ञान अगदी साधे आहे: दिवाळीचा आनंद फक्त त्यांच्या स्वतःच्या घरापुरताच मर्यादित का असावा? त्यांच्यासोबत कठोर परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही तितक्याच आनंदाने सण साजरा करण्याचा अधिकार आहे. ते आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ कामगार म्हणून पाहत नाहीत, तर त्यांना आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानतात. पैशाने तुम्ही श्रीमंत होऊ शकता, पण अशा प्रकारच्या हृदयामुळे माणूस खऱ्या अर्थाने 'समृद्ध' असतो," असे एका युजरने म्हटले.

काही युजर्सनी गमतीने विचारले की, त्यांच्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES