• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /बाहेर पत्नीचे दिवसकार्य सुरू अन् पती बेडरूममध्ये प्रेयसीसोबत..., कुठली आहे ही घटना?

बाहेर पत्नीचे दिवसकार्य सुरू अन् पती बेडरूममध्ये प्रेयसीसोबत..., कुठली आहे ही घटना?

एका मुलीच्या मृत्यूमुळे मुलं आणि तिचे घरचे दुःखात होते. घरात मृत महिलेचे दिवस कार्य सुरू होते आणि पती मात्र बेडरूममध्ये प्रेयसीसोबत होता. मुलांनी वडिलांना रंगहात पकडल्यावर एकच खळबळ माजली.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 15, 2026, 10:31 PM IST|Updated: Oct 19, 2026, 06:16 PM IST
joinshare
बाहेर पत्नीचे दिवसकार्य सुरू अन् पती बेडरूममध्ये प्रेयसीसोबत..., कुठली आहे ही घटना?
Image Credit: Uttarakhand

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उत्तराखंडमधील ग्वाड-गंगोली गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. महिलेच्या निधनामुळे तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक दुःखात बुडाले होते. घरात महिलेचे दिवसकार्य सुरु असताना पतीच्या धक्कादायक कृत्यामुळे कुटुंबासह गावात खळबळ माजली आहे. पत्नीचं दिवसकार्य सुरू होतं आणि पती बेडरूममध्ये प्रेयसीसोबत रंगहात पकडला गेला. संतापजनक म्हणजे मुलांनीच आपल्या वडिलांना हे कृत्य करताना पकडलंय. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी दोघांना पोलिसांकडे स्वाधीन केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी पतीविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

या घटनेची माहिती देतेना पोलिसांनी सांगितलं की, 23 सप्टेंबरला ग्वाड गंगलोल गावात एका घरात कुसमादेवी यांनी आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह राहत्या घरात दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला. प्राथमिक पाहणीत त्या महिलेने आत्महत्या केली असं दिसत होतं. पण मृत महिलेच्या बहिणीच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. बहिणीने मृतदेह महिलेचा पती विक्रम लालवर आपल्या बहिणीच्या हत्येचा आरोप केला. ज्यामुळे पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु झाला. 

घरात त्या महिलेच्या अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी करण्यात येत होते. मुलं, नातेवाईक आणि गावकरी या घटनेमुळे शोकाकुल होते. पण अशातच दुसरीकडे महिलेचा पती कुठे दिसत नव्हता. महिलेला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी वडिलांचा शोध घेतला तर घरात आईचा विधी सुरु होता आणि वडील दुसऱ्या खोलीत एका महिलेसोबत होते. मुलांनी हा सर्व प्रकार गावातील सरपंचाना सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांनीही घराला बाहेरून कडी लावली. मग त्यांनी लगेचच गोपेश्वर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते या घर पोहोचले. त्यांनी घराची झाडझडती घेतली असताना त्या त्याच गावातील एक विधवा महिला दिसली. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेलाही दोन मुलं आहेत. 

गोपेश्वरचे पोलीस ठाणेप्रमुख नवनीत भंडारी यांनी या घटनेबद्दल सांगितलं की, पोलिसांनी तसाप सुरू केल्यावर असं समोर आलं की, गेल्या काही काळापासून या दोघांचे प्रेमसंबंध सुरू आहे. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईक हे संतापले असून त्यांनी गोपेश्वर पोलीस ठाण्यावर मोर्चा आणला होता. कुसमादेवी यांच्या मृत्यूमागे या दोघांचे अनैतिक संबंध कारणीभूत आहे. त्यामुळे यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनीही पती विक्रम लालविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या पुरूषाला शांतता भंगाच्या कलमान्वये तुरूंगात ठेवण्यत आलं आहे. तर महिलेची कसून चौकशी करून तिला कुटुंबियांकडे सोपवण्यात आलंय. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News
india
crime