)
दिवाळी सणानिमित्त फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या उग्र झाली असून दिल्ली आणि मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. यामुळे अनेकांना घशातील खवखव आणि डोळ्यांची जळजळ होण्यासारखे आजार होत आहेत. फटाक्यांचे दुष्परिणाम सांगणारे आणि फटाक्यांचे समर्थन करणारे लोक आमनेसामने आलेले असतानाच पश्चिम बंगालमधील भाजपाच्या आमदारांनी फटाक्यांमुळे अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता उलटसुलट चर्चा होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे
सदर भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यवतमाळ यांच्यामार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संबंधित महसूल व स्थानिक प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारने शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा दिलेला अधिकाराचा अध्यादेश असंवैधानिक असल्याने रद्द करावा, अशी मागणी सतेज पाटलांनी केलीय.त्यांनी यासंदर्भात त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुरुवातीपासूनच घातपाताची शंका व्यक्त करत आलेलो आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सातत्याने केली आहे. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही या प्रकरणासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर आलं, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आपण पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे काही संशयास्पद फोटो आणि संबंधित माहिती देऊन चौकशीची मागणी केली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.तसेच अशोक खरात प्रकरणातील काही बाबींचाही अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने तपास करण्याची मागणी करण्यात आली होती असल्याच ही मिटकरी म्हणाले.. वारंवार घातपाताची शंका उपस्थित होत असेल, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करावी, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे.
फटाक्यांच्या किरकोळ पैशांच्या वादातून एकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडलीय.. 8 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या रात्री श्रीरामपूर शहरातील टिळकनगर परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. गाडी अंगावर घातल्याने एकाचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झाले आहेत.
पाचशे कोटीच्या खाली संदर्भात सरकार चौकशी करेल मी त्यांना वेळ दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना हा विषय माहीत नाही. म्हणून ते या लोकांना वाचवणार नाहीत. आणि जर वाचवलं तर त्यांचाही हात होता असं समजायचं, असे मनोज जरांगे म्हणाले. शिंदे साहेब म्हणतात मीही घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर हा मोठा डाग आहे ते त्या बाईला सोडणार नाहीत.सत्तेवर बसायचं असेल तर मराठ्यांशिवाय शिंदे आणि फडणवीस बसू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 9 november 2026: यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.साताऱ्यातील फलटण शहरात विमानतळ परिसरात एका मद्यपी ऊस ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा प्रताप समोर आला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांत पुण्याबाहेरचे बरेचसे लोक आपआपल्या गावाला गेल्याने पुण्याचे रस्ते बऱ्यापैकी मोकळा श्वास घेताना दिसताहेत.दिवाळी सणानिमित्त फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या उग्र झाली असून दिल्ली आणि मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.