)
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 4 नोव्हेंबरला नियुक्ती आदेश वितरण समारंभ होणार आहे. यामध्ये 674 विशेषज्ञ डॉक्टर आणि 766 एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश असेल. राज्यातील रिक्त वैद्यकीय पदे भरण्यासाठी शासनाचा पुढाकार असून ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार आणि वेळेवर उपचार मिळणार आहेत. नवनियुक्त डॉक्टरांनी सेवाभावाने काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आपल्या पराभवानंतर काही लोकांनी दात दाखवले,पण त्यांचे दात पाडल्याशिवाय आता आपण स्वस्थ बसणार नाही,असा इशारा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटलांना दिला आहे,तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना,भाजपा कोम्यात असल्यासारखी होती,त्यामुळे माझा पराभव झाला,पण आता यापुढे यश मिळत राहील,असा विश्वास संजयकाका पाटलांनी व्यक्त केला आहे, तासगाव सोसायटी गटातून संजयकाका पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यामध्ये काट्याची लढत झाली, ज्यामध्ये संजयकाका पाटील यांनी अवघ्या दोन मताने माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव केला,विजयानंतर तासगाव मध्ये संजयकाका पाटील समर्थकांनी जल्लोष करत विजयोउत्सव साजरा केला आहे.
आता आमचा पोलिस हिंदी पिक्चर मधला राहिला नाही. जो सगळी घटना घडल्यावर पोहचत होता. आता पोलिस वेळेत पोहचतात, आता घटना घडताना किंवा घडण्या पूर्वी पोलिस पोहचत आहेत. आधी १०० गुन्हेगार पकडले तर १३ जणांना शिक्षा व्हायची ८७ जण सुटायचे, आता ७० गुन्हेगारांना शिक्षा होत आहे, ती आणखी वाढवायची आहे आणि त्याला अत्याधुनिक प्रणाली ची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे तिथे काय उणे अस म्हटल जाते, आता पिंपरी चिंचवड साठी ही तसेच काही म्हणावे लागेल...! पिंपरी चिंचवड तिथं काही नाही गडबड, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पोलिसांकडे आधुनिक वाहने गरजेचे आहेत. गुन्हेगारांकडे चांगली वाहने आहेत, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडे ही चांगली वाहने हवी आहे, तेंव्हाच आपण त्यांना म्हणू शकतो कनवेक्शन रेट वाढला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
खालापूर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावल्याच्या आरोपानंतर एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवन संपवलं. हिरानंदानी फॉर्च्युन सिटीमध्ये घडलेल्या या घटनेने खालापूर तालुका हादरला असून, व्याजाच्या पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित दाम्पत्याचा शोध सुरू आहे.पतीने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी घरी येऊन धमकावल्याचा आरोप आहे. पती घरी नसताना विश्वनाथ देसाई आणि त्यांच्या पत्नीने मानसी पोपटे यांना धमकावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर मानसी यांनी आपल्या 11 आणि 8 वर्षांच्या दोन मुलांसह आत्महत्या केली. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. संशयित दाम्पत्य फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिंदे गटाच्या युक्तिवादाला ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून उत्तर दिले जाऊ शकते. यापूर्वी त्यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावण्याची मागणी केली होती. आज त्यांच्या प्रतिवादाकडेही लक्ष असेल.
शिवसेना कोणाची, हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांचे संख्याबळ ग्राह्य धरायचे की पक्षाच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे बहुमत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या बहुमताच्या निकषाचे समर्थन केले आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयोगाने कोणत्या निकषांवर निर्णय घेतला, यावर चर्चा अपेक्षित आहे.
ठाकरे गटाची भूमिका अशी आहे की, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास निवडणूक आयोगाने घेतलेल्या पक्षचिन्हाच्या निर्णयाचा आधारच प्रभावित होऊ शकतो. या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद महत्त्वाचे ठरणार आहेत.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच आहे का? विधानसभा अस्तित्वात नसताना अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय देता येतो का? या घटनात्मक मुद्द्यांवर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी यापूर्वी असा युक्तिवाद केला की, 14व्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपल्याने आमदारांच्या अपात्रतेची याचिका आता निष्फळ ठरली आहे. आज न्यायालय या मुद्द्यावर काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरेल.
गेल्या सुनावणीत शिंदे गटाने विधानसभा मुदत संपल्यामुळे अपात्रतेची याचिका निष्फळ ठरल्याचा दावा केला होता. आजच्या सुनावणीत या युक्तिवादावर आणि पक्षचिन्हाच्या वादावर काय चर्चा होते, याकडे लक्ष आहे.
आज, 3 नोव्हेंबर 2026 रोजी शिवसेनेचे पक्षनाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करणार आहेत.
अत्यंत आधुनिक पोलिस मुख्यालय आपण उभारत आहोत.अजित दादानी स्वतः आयुक्तालयाच्या डिजाइन कडे लक्ष घालणार असे सांगितले होते, आणि त्यांनी जातीने लक्ष घातले आणि आज ही अत्याधुनिक इमारत उभारत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सातारा जिल्हा बँकेत भाजपचं वर्चस्व; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, शिवसेनेला ४ जागा मिळाल्या. MHT-CET परीक्षेत कशा प्रकारे गैरप्रकार चालतात त्याचे सादरीकरण रोहित पवार यांनी केलंय. अशा अनेक महत्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.