SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी; ध्रुव मेहता यांचा युक्तिवाद, ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीची प्रत्येक लाईव्ह अपडेट जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 03, 2026, 02:07 PM IST | Updated: Nov 03, 2026, 02:44 PM IST
Image Credit: शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी
Join

आज, 3 नोव्हेंबर 2026 रोजी शिवसेनेचे पक्षनाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करणार आहेत.

03 Nov 2026, 2:43 PM

ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रतिवादाची शक्यता

 

शिंदे गटाच्या युक्तिवादाला ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून उत्तर दिले जाऊ शकते. यापूर्वी त्यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावण्याची मागणी केली होती. आज त्यांच्या प्रतिवादाकडेही लक्ष असेल. 

03 Nov 2026, 2:32 PM

विधिमंडळातील बहुमत की संघटनात्मक बहुमत?

 

शिवसेना कोणाची, हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांचे संख्याबळ ग्राह्य धरायचे की पक्षाच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे बहुमत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या बहुमताच्या निकषाचे समर्थन केले आहे. 

03 Nov 2026, 2:29 PM

धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयावर सुनावणी

 

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयोगाने कोणत्या निकषांवर निर्णय घेतला, यावर चर्चा अपेक्षित आहे.

03 Nov 2026, 2:24 PM

अपात्रतेचा निर्णय पक्षचिन्हाच्या वादावर परिणाम करणार का?

 

ठाकरे गटाची भूमिका अशी आहे की, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास निवडणूक आयोगाने घेतलेल्या पक्षचिन्हाच्या निर्णयाचा आधारच प्रभावित होऊ शकतो. या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद महत्त्वाचे ठरणार आहेत. 

03 Nov 2026, 2:22 PM

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर होणार चर्चा?

 

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच आहे का? विधानसभा अस्तित्वात नसताना अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय देता येतो का? या घटनात्मक मुद्द्यांवर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

03 Nov 2026, 2:19 PM

विधानसभा मुदत संपल्याने अपात्रता याचिका निष्फळ ठरते का?

 

शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी यापूर्वी असा युक्तिवाद केला की, 14व्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपल्याने आमदारांच्या अपात्रतेची याचिका आता निष्फळ ठरली आहे. आज न्यायालय या मुद्द्यावर काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरेल. 
 

03 Nov 2026, 2:17 PM

गेल्या सुनावणीत काय घडलं?



गेल्या सुनावणीत शिंदे गटाने विधानसभा मुदत संपल्यामुळे अपात्रतेची याचिका निष्फळ ठरल्याचा दावा केला होता. आजच्या सुनावणीत या युक्तिवादावर आणि पक्षचिन्हाच्या वादावर काय चर्चा होते, याकडे लक्ष आहे. 

03 Nov 2026, 2:12 PM

अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


आज, 3 नोव्हेंबर 2026 रोजी शिवसेनेचे पक्षनाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES