रणबीर कपूर आणि आलियाचं लेक राहासोबत दिवाळीचं गोड सेलिब्रेशन
Published: Nov 09, 2026, 14:57 IST|Updated: Nov 09, 2026, 15:10 IST
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहाने तिच्या वडिलांसारखाच, खास तिच्यासाठी तयार केलेला, ऑफ-व्हाइट रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता.
दोघांनी लेकीसोबत गोड सेलिब्रेशन केलं.
1/9आलिया भट्टने शेअर केले इंस्टाग्रामवर फोटो
आलिया भट्टने सोशल मीडियावर कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/9कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होत असताना, सेलिब्रिटीही आपल्या कुटुंबासोबत आनंदाचा क्षण साजरा करत आहेत.
3/9रणबीर आणि राहासोबत दिवाळीचे क्षण
नुकतेच आलिया भट्टने इंस्टाग्रामला पती रणबीर आणि मुलगी राहासोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
4/9फोटोंनी वेधलं लक्ष
या फोटोंमध्ये आलिया पती रणबीर कपूर आणि त्यांची मुलगी राहा यांच्यासोबत दिवाळीचा आनंद लुटताना दिसत आहे.
5/9 लक्ष्मीपूजन
आलिया यावेळी लक्ष्मीपूजन करतानाही फोटोत दिसत आहे.
6/9पारंपारिक पोषाख
तिघांनाही यावेळी अतिशय सुंदर आणि पारंपरिक पेहराव केला होता.
7/9आलियाचा लेहंगा
आलियाने पिस्ता-हिरव्या रंगाचा लेहेंगा सेट घातला होता. तर रणबीर कपूरने क्लासिक ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता.
8/9राहा आणि वडिलांचं मॅचिंग
राहाला यावेळी वडिलांशी मॅचिंग करत खास तिच्यासाठी तयार केलेले ऑफ-व्हाइट रंगाचे पारंपारिक कपडे घातले होते. ज्यामध्ये ती गोंडस दिसत होती.
9/9'लव्ह अँड वॉर' मध्ये दिसणार एकत्र
कामाबद्दल बोलायचे गेल्यास रणबीर आणि आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' (Love & War) या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.