• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या आयुष्यात वादळ! तिसऱ्यांदा मोडला संसार, 13 वर्षांनी रशियन पत्नीपासून विभक्त

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या आयुष्यात वादळ! तिसऱ्यांदा मोडला संसार, 13 वर्षांनी रशियन पत्नीपासून विभक्त

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 10, 2026, 09:10 IST|Updated: Nov 10, 2026, 09:17 IST
joinshare
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी आपण पत्नीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

यासह पवन कल्याण यांचं तिसरं वैवाहिक नातंही संपलं आहे.

Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 1/8

अभिनेते पवन कल्याण पत्नीसापासून विभक्त

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आलं आहे. त्यांनी पत्नी, ॲना कोनिदापासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 2/8

पवन कल्याण आणि अॅना 13 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे

पवन कल्याण आणि अॅना यांनी 13 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोमवारी रात्री उशिरा पवन कल्याण यांच्या इंस्टाग्राम पेजवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 3/8

भविष्यातही चांगले मित्र राहू

संयुक्त निवेदनात त्यांनी हा निर्णय परस्पर समंजसपणाने आणि आदराने घेतला असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, ते भविष्यातही चांगले मित्र म्हणून राहतील.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 4/8

मुले सर्वोच्च प्राथमिकता असतील

"आमचे वैवाहिक नाते संपले असले, तरी आम्ही चांगले मित्र राहू आणि आमच्या मुलांचे जबाबदार पालक म्हणून त्यांची काळजी घेत राहू. मुलांचा आनंद आणि त्यांचे कल्याण ही आमच्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल," असं त्यांनी सांगितलं आहे.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 5/8

गोपनीयतेचा आदर राखण्याची विनंती

यावेळी त्यांनी आपल्या हितचिंतकांना या कठीण काळात आपली गोपनीयता जपली जावी, अशी विनंतीही केली आहे. "आमच्या आयुष्यातील या बदलाच्या काळात, आम्हाला तुमच्या समजूतदारपणाची, दयाळूपणाची आणि आमच्या गोपनीयतेचा आदर राखण्याची अपेक्षा आहे. या प्रवासात ज्यांनी आम्हाला साथ दिली, त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो." असे त्यांनी सांगितले आहे.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 6/8

पवन कल्याण यांचं तिसरं वैवाहिक नातंही संपलं

दरम्यान यासह पवन कल्याण यांचं तिसरं वैवाहिक नातंही संपलं आहे. यापूर्वी, पवन कल्याण यांचा 1997 मध्ये नंदिनी यांच्याशी विवाह झाला होता, परंतु 1999 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 7/8

2013 मध्ये ॲना यांच्याशी लग्न

2013 मध्ये पवन कल्याण यांनी मूळच्या रशियाच्या असलेल्या ॲना यांच्याशी विवाह केला. त्यांना पोलेना अंजना पवनोव्हा आणि मार्क शंकर पवनोविच ही दोन मुले आहेत.
Pawan Kalyan and his wife Anna Konidala announced seperation 8/8

पवन कल्याण यांची कारकीर्द

अभिनेते चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू यांचे धाकटे भाऊ कल्याण यांनी 1996 मध्ये 'अक्कडा अम्मायी इक्कडा अब्बायी' (Akkada Ammayi Ikkada Abbayi) या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी 2008 मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी जन सेना पक्षाची स्थापना केली आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
TAGS:
Entertainment News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.