भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांवर निशाणा साधताना थेट त्यांच्या प्रॉपर्टीचा उल्लेख केला आहे. यामुळे सतेज पाटलांची संपत्ती चर्चेत असतानाच चंद्रकांत पाटलांची संपत्ती किती हे पाहूयात...
काँग्रेस आमदार सतेज पाटलांना संपत्तीसंदर्भात विचारणा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची एकूण संपत्ती किती? त्यांनीच यासंदर्भात दिलेल्या तपशीलावरुन जाणून घेऊयात सविस्तर माहिती...
2/10
चंद्रकांत पाटील चांगलेच चर्चेत
गोकुळच्या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं मागील काही आठवड्यांपासून दिसून येत आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीमध्ये महायुतीने शासन नियुक्त सदस्यांच्या मदतीने बाजी मारली असली तरी या गोंधळामुळे भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील चांगलेच चर्चेत आहेत. (सर्व फोटो प्रातिनिधिक सौजन्य सोशल मीडियावरुन साभार)
3/10
प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा लेखाजोखा दिला
महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते अशी चंद्रकांत पाटलांची ओळख आहे. ते सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री असून 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोथरूड (पुणे) मतदारसंघातून दाखल केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा लेखाजोखा दिला आहे.
4/10
चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची संपत्ती काढली
मंगळवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी, निकाल लागण्याआधीच चंद्रकांत पाटलांनी महायुतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये महायुतीविरुद्ध लढून 25 पैकी 13 सदस्य निवडून आणणारे आणि समविचारी आघाडीचं नेतृत्व करणारे काँग्रेस आमदार सतेज पाटलांवर सडकून टीका केली. टीकेदरम्यान त्यांनी सतेज पाटलांकडे एवढी संपत्ती कुठून आली? असा सवालही विचारला. मात्र सतेज पाटलांची संपत्ती काढणाऱ्या चंद्रकांत पाटलांची संपत्ती किती आहे हे माहितीये का? याबद्दलच जाणून घेऊयात...
5/10
जंगम मालमत्ता
चंद्रकांत पाटलांची जंगम मालमत्ता सुमारे 5.46 कोटी रुपये (5 कोटी 46 लाख 86 हजार 868 रुपये)इतकी आहे. यामध्ये बँक खात्यांमधील ठेवी, मुदत ठेवी (एफडी) आणि इतर गुंतवणुकींचा समावेश आहे.
6/10
स्थावर मालमत्ता
स्थावर मालमत्तेचा विचार केला तर चंद्रकांत पाटलांकडे सुमारे 3.46 कोटी रुपये (3 कोटी 46 लाख 68 हजार 322 रुपये) इतकी आहे. यामध्ये शेतजमीन, बिगरशेती जमीन, व्यावसायिक आणि निवासी इमारती अथवा घरे यांचा समावेश आहे.
7/10
एकूण कर्ज किती?
चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर सुमारे 21.69 लाख रुपयांचे (21 कोटी 69 लाख 245 रुपये) कर्ज असल्याचं किंवा आर्थिक दायित्व असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
8/10
एकूण संपत्ती किती?
चंद्रकांत पाटील यांची एकूण संपत्ती सुमारे 8.93 कोटी रुपये (8 कोटी 93 लाख 55 हजार 190 रुपये) इतकी आहे. हा तपशील 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे. आता या आकड्यांमध्ये बदल झालेला असू शकतो.
9/10
सतेज पाटलांची एकूण संपत्ती पाचपट अधिक
दुसरीकडे, चंद्रकांत पाटलांनी टीका केलेल्या सतेज पाटलांची एकूण संपत्ती 40 कोटींहून अधिक आहे. म्हणजेच ही संपत्ती चंद्रकांत पाटलांच्या संपत्तीपेक्षा पाचपट अधिक आहे.
10/10
सतेज पाटलांची नेमकी संपत्ती किती?
निवडणूक आयोगाकडे 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रामध्ये सतेज पाटलांनी त्यांची एकूण मालमत्ता 40 कोटी 91 लाख 94 हजार 848 रुपये (सुमारे 41 कोटी रुपये) असल्याचं नमूद केलं आहे.