• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /विराट कोहलीची एकूण संपत्ती 1000 कोटींहून जास्त, मुंबई ते लंडनपर्यंत आलिशान बंगले, वार्षिक कमाई वाचून डोळे फिरतील

विराट कोहलीची एकूण संपत्ती 1000 कोटींहून जास्त, मुंबई ते लंडनपर्यंत आलिशान बंगले, वार्षिक कमाई वाचून डोळे फिरतील

Reported Bypooja pawar
Published: Nov 03, 2026, 09:15 PM IST|Updated: Nov 03, 2026, 09:23 PM IST
joinshare

Virat Kohli Networth : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटर्सपैकी एक मानला जातो. विराट कोहलीने आपल्या क्रिकेटमधील कामगिरीने जगभरात नाव मिळवलं, यासह कोट्यवधींची संपत्ती सुद्धा कमावली. विराट कोहली 5 नोव्हेंबर 2026 रोजी 38 वर्षांचा होणार आहे. तेव्हा भारताच्या या स्टार क्रिकेटरची एकूण संपत्ती किती आणि त्याच्या कमाईची साधन कोणती आहेत, याविषयी जाणून घेऊयात. 

Virat Kohli 1/6

विराट कोहलीची कमाई

विराट कोहली त्याची कमाई केवळ क्रिकेटमधून करत नाही, तर त्याने कमाईची अनेक साधन निर्माण केली आहेत. विराटची संपत्ती प्रामुख्याने ब्रँड एंडोर्समेंट्स, व्यावसायिक उपक्रम आणि इक्विटी गुंतवणुकीतून येते. विराटची वार्षिक कमाई अनेकदा 167 ते 209 कोटी रुपयांच्या वर गेलेली असते, ज्यातील मोठा हिस्सा विविध ब्रँड्ससोबत केलेल्या करारांतून मिळतो.
Virat Kohli 2/6

विराट कोहली आयपीएल

विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी खेळतो. 2013 ते 2022 पर्यंत विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार होता. कोहलीला बीसीसीआयकडून 'ग्रेड A+' स्तरावरील सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत वेतन मिळते, जे वार्षिक सुमारे 6.7 कोटी ते 7.1 कोटी रुपयांच्या दरम्यान असते. यात मॅच फी आणि कामगिरीवर आधारित बोनसचा समावेश नाही. आयपीएलमध्येही तो गेल्या दशकाहून अधिक काळापासून सातत्याने सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूंपैकी एक राहिला आहे.
Virat Kohli 3/6

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

2025 ते 2026 च्या सिजनसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सोबतच्या करारानुसार त्याला वार्षिक सुमारे 21 कोटी रुपये मिळतात. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत त्याला मिळालेले एकूण मानधन 209 कोटी ते 251 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एकूण कमाई ज्यामध्ये पगार आणि मॅच फी चा समावेश आहे. आयपीएलमधील विराटची एकूण कमाई सुमारे 334 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे.
Virat Kohli 4/6

विराट कोहली ब्रँड्स एंडोर्समेंट कमाई :

विराट कोहली हा जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे प्यूमा, ऑडी, एमआरएफ टायर्स सारखे 30 पेक्षा अधिक ब्रँड्स आहेत. आपल्या करिअरच्या पीकवर असताना विराटने दरवर्षी जवळपास 167 ते 209 कोटींची कमाई ही ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून केली आहे. यातून त्याची लाइफटाइम एंडोर्समेंट कमाई ही 200 मिलियन पेक्षा जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती ही 1 हजार कोटी इतकी आहे.
Virat Kohli 5/6

रिअल एस्टेट प्रॉपर्टी

विराट आणि अनुष्का या दोघांकडे एकूण $20 ते 25 मिलियन किंमतीची रिअल एस्टेट प्रॉपर्टी आहे. त्यांच्या मालमत्तांमध्ये गुरुग्राममधील 10,000 चौरस फुटांचे आलिशान घर, अलिबागमध्ये अनेक एकर परिसरात पसरलेली मालमत्ता आणि मुंबईत समुद्रकिनारा दिसणारे एक उच्च दर्जाचे अपार्टमेंट (यांचा समावेश आहे. या जोडप्याच्या मालकीचे लंडनमध्येही एक घर आहे.
Virat Kohli 6/6

विराट कोहली क्रिकेट कारकिर्द :

विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर त्याने आतापर्यंत 123 टेस्ट, 317 वनडे आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
TAGS:
Virat Kohli
Marathi News
Cricket News
Team india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

2

राष्ट्रवादी पक्षात नेमकं चाललंय काय? 20 आमदारांची बैठक; सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

3

सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय

4

रणजी ट्रॉफीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, एका रात्रीत बदलला संपूर्ण संघ; नेमकं काय घडलं?

5

टी20 नंतर वनडेतही टीम इंडिया न्यूझीलंडला देणार दणका? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.