• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /बापरे! दर तासाला ₹20 लाखांची चोरी, मागील 6 वर्षात वाढलं प्रमाण; महाराष्ट्रातील 8 लाखांहून अधिक लोकांना बसलाय फटका

बापरे! दर तासाला ₹20 लाखांची चोरी, मागील 6 वर्षात वाढलं प्रमाण; महाराष्ट्रातील 8 लाखांहून अधिक लोकांना बसलाय फटका

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 13:11 IST|Updated: Nov 13, 2026, 13:33 IST
joinshare
हादरवून टाकणारी ही आकडेवारी नेमकी आहे कसली? कशाप्रकारे मागील काही वर्षांमध्ये ही फसवणूक वाढत गेली? सध्या यासंदर्भातील आकडेवारी काय सांगते? जाणून घेऊयात सविस्तरपणे...

आपल्या हक्काचा, कष्टाने कमवलेल्या पैशावर कोण आणि कसा मारतंय डल्ला? नक्की कोणत्या वर्षी किती पैसा अशाप्रकारे गायब झाला? एकदा वाचाच...

cyber crime1/8

सर्वसामान्यांना गंडवलं

8 लाख 77 हजार 103 जणांना कोणी आणि कसं गंडवलं? नक्की काय घडलं? वाचाच...
cybercrime2/8

तासाला 20 लाख रुपये गायब

तुम्ही आणि तुमच्यासारख्या लाखो सर्वसामान्यांनी घाम गाळून कमवलेल्या पैशांमधून 20 लाख रुपये दर तासाला चोरीला जात असल्याचं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, खरं बोलतोय ना? हा सारा प्रकार आपल्या साऱ्यांच्या डोळ्यांसमोर घडतोय आणि तो ही अगदी सहज... नेमका हा पैसा जातोय कसा आणि कुठे पाहूयात...
cybercrime3/8

राज्यातील बँक खात्यांमधून सहा वर्षांमध्ये...

तर महाराष्ट्रातील ही थक्क करणारी आकडेवारी सायबर गुन्हेगारीसंदर्भातील आहे. राज्यातील बँक खात्यांमधून सहा वर्षांमध्ये 10 हजार 844 कोटी लुटण्यात आले आहेत. म्हणजेच तासांच्या हिशोबाने पाहिला तर हा आकडा ताशी 20 लाख रुपयांची चोरी असा होतो.
cybercrime4/8

8 लाख 77 हजार 103 तक्रारी

तर 2021 ते ऑगस्ट 2026 दरम्यान सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल आणि 1930 या हेल्पलाइनवर 8 लाख 77 हजार 103 जणांनी तक्रारी नोंदवल्यात. धक्कादायक म्हणजे, फसवणुकीचा आकडा हजारो कोटींवर पोहोचला असताना रिकव्हरी केवळ 1 हजार 753 कोटींची झाली आहे.
cybercrime5/8

किती पैसे केले रिकव्हर

2021 ते 2026 या कालावधीत 1 हजार 756 कोटी 70 लाख रुपये होल्ड अथवा रिकव्हर करण्यात यश आले. 2021 मध्ये हा आकडा 53.20 लाख रुपये होता. 2024 मध्ये 440 कोटी, 2025 मध्ये 617 कोटी, तर 2026 मध्ये आकडेवारीनुसार 587 कोटी रुपये गोठविण्यात आले.
cybercrime6/8

वर्षाला 19.33 कोटींवरुन काही हजार कोटी

आकडेवारीतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे 2021 मध्ये फसवणुकीची एकूण रक्कम 19.33 कोटी रुपये होती. मात्र मागील काही वर्षांमध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय. 2022 ला हा आकडा 147.31 कोटी, 2023 मध्ये 965.79 कोटी, तर 2024 मध्ये थेट 4 हजार 55 कोटी रुपयांवर पोहोचली.
cybercrime7/8

मागील दोन वर्षात किती कोटींची फसवणूक झाली?

2025 मध्ये फसवणुकीची रक्कम 3 हजार 536 कोटी होती. 2026 मध्ये ऑगस्टपर्यंत 2 हजार 119 कोटी रुपयांची फसवणूक नोंदविण्यात आली आहे.
cybercrime8/8

नव्या प्रकारची फसवणूक वाढली

डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढत असतानाच आता यामध्ये बॉस स्कॅम, इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची डोकेदुखी वाढत असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
TAGS:
Maharashtra News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.