• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /खासदार संख्या 543 वरुन 850 झाली तर त्यांच्या मासिक पगारासाठी सर्वसामान्य करदात्यांचा किती पैसा सरकारला खर्च करावा लागेल? थक्क करणारी आकडेमोड

खासदार संख्या 543 वरुन 850 झाली तर त्यांच्या मासिक पगारासाठी सर्वसामान्य करदात्यांचा किती पैसा सरकारला खर्च करावा लागेल? थक्क करणारी आकडेमोड

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 28, 2026, 08:51 IST|Updated: Nov 28, 2026, 09:23 IST
joinshare
खासदारांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली तर या अतिरिक्त खादारांच्या पगारासाठी दर महिन्याला किती अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार? सध्या किती पैसा खर्च होतोय? खासदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर माहिती...

खासदारांची संख्या वाढली तर कशाप्रकारे सरकारी तिजोरीवर ताण पडणार? करदात्यांचा किती पैसा या नव्या खासदारांच्या पगारासाठी वापरला जाणार? जाणून घ्या ए टू झेड माहिती...

mpsalarynews1/9

खासदारांच्या पगारावर किती रुपये खर्च होणार?

खासदारांची संख्या 50 टक्क्यांनी वाढणार असल्याने त्यांच्या पगारावरील खर्च कितीने वाढणार आहे? जाणून घ्या सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातील किती पैसा या नव्या खासदारांच्या मासिक पगारासाठी खर्च करावा लागणार...
delimitation bill new mp salary2/9

तिजोरीवर मोठा आर्थिक भार

देशात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याची चर्चा सुरू आहे. सध्या लोकसभेत 543 निवडून आलेले खासदार आहेत. ही संख्या वाढून 850 झाल्यास सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे.
delimitation bill new mp salary3/9

मासिक भत्त्यांवर वर्षाला किती खर्च वाढणार?

सध्याच्या वेतन आणि भत्त्यांच्या दरानुसार केवळ खासदारांच्या वेतन आणि नियमित मासिक भत्त्यांवर वर्षाला सुमारे 105 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होण्याचा अंदाज आहे
delimitation bill new mp salary4/9

खासदारांचा पगार किती?

संसदेच्या अधिकृत माहितीनुसार, खासदारांना दरमहा 1 लाख 24 हजार रुपये मूळ वेतन मिळते. याशिवाय 87 हजार रुपये मतदारसंघ भत्ता आणि 75 हजार रुपये कार्यालयीन खर्च भत्ता दिला जातो. अशा प्रकारे एका खासदारासाठी दरमहा एकूण 2 लाख 86 हजार रुपयांची तरतूद होते
delimitation bill new mp salary5/9

भत्ता किती मिळतो?

कार्यालयीन खर्च भत्त्यातील 25 हजार रुपये स्टेशनरी आणि टपाल खर्चासाठी, तर 50 हजार रुपये सचिवीय सहाय्यकांसाठी असतात. याशिवाय संसदेच्या कामकाजासाठी कर्तव्यावर असताना प्रतिदिन 2500 रुपये दैनिक भत्ता मिळतो.
delimitation bill new mp salary6/9

सध्याच्या खासदारांना पगार देण्यासाठी किती खर्च येतो?

सध्या 543 खासदारांसाठी दरमहा वेतन आणि नियमित भत्त्यांचा एकत्रित खर्च सुमारे 15.53 कोटी रुपये होतो.
delimitation bill new mp salary7/9

850 खासदार झाले तर पगारावर खर्च किती?

खासदारांची संख्या 543 वरुन 850 झाल्यास दरमहा वेतन आणि नियमित भत्त्यांचा खर्च 24.31 कोटी रुपयांवर पोहोचेल.
delimitation bill new mp salary8/9

दर महिन्याचा खर्च कितीने वाढणार?

म्हणजेच 307 नवीन खासदारांची भर पडल्यास दरमहा 8.78 कोटी रुपये अतिरिक्त खर्च होतील. वर्षभरात हा आकडा 105.36 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल
delimitation bill new mp salary9/9

हा केवळ वेतन आणि भत्त्यांचा खर्च!

विशेष म्हणजे, या गणितात खासदारांचा दैनिक भत्ता, निवासव्यवस्था, प्रवास, सुरक्षा, कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि इतर सोयीसुविधांचा खर्च समाविष्ट नाही. त्यामुळे खासदारांची संख्या वाढल्यास सरकारवरील प्रत्यक्ष आर्थिक भार यापेक्षा अधिक असू शकतो. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
TAGS:
Indian Politics
Political News
india

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.