या दोघांचं 2012 मध्ये लग्न झालं होतं. आता 14 वर्षानंतर ते विभक्त होत असून मुलांचा संभाळ कोण आणि कसा करणार याबद्दलचा खुलासाही करण्यात आला आहे. नेमकं काय म्हटलंय जारी केलेल्या निवेदनात जाणून घ्या...
या नेत्याच्या पत्नीने थेट सोशल मीडियावरून पोस्ट करुन घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली आहे. नेमकं काय म्हटलंय या नेत्याच्या पत्नीने वाचा सविस्तरपणे...
1/10
आम्ही विभक्त होतोय, मंत्र्याच्या पत्नीची पोस्ट
एका लोकप्रिय नेत्याच्या पत्नीने घटस्फोटाची घोषणा थेट इन्स्टाग्रामवरुन केली आहे. या महिलेचे वडील हजारो कोटींचे मालक असून तिने आपण पतीपासून वेगळे होत असल्याचं जाहीर करताना मुलांबद्दल काय म्हटलंय जाणून घ्या...
2/10
प्रसिद्ध दाक्षिणात्य नेत्याचा घटस्फोट
सध्या मंत्रिमंडळात असलेल्या एका प्रसिद्ध दाक्षिणात्य नेत्याचा घटस्फोट झाला असून त्याच्या पत्नीनेच सोशल मीडियावरुन यासंदर्भातील घोषणा केली आहे. नेमका हा नेता कोण आणि त्याच्या पत्नीने घटस्फोटासंदर्भात काय म्हटलंय पाहूयात...
3/10
हा मंत्री कोण?
तामिळनाडूचे सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास मंत्री अधव अर्जुन आणि त्यांच्या पत्नी डेझी मार्टिन यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी आपल्या 14 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.
4/10
वडील लॉटरी व्यावसायिक
डेझी मार्टिन यांनी सोमवारी ही माहिती दिली. डेझी या लॉटरी व्यावसायिक सँटियागो मार्टिन यांच्या कन्या आहेत. सँटियागो मार्टिन यांची एकूण संपत्ती ₹4149 कोटी इतकी आहे. त्यांची पत्नी लीमा रोज मार्टिन यांनी 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या संपत्तीचा उल्लेख आहे.
5/10
14 वर्षे एकमेकांच्या आयुष्याचा भाग राहिल्यानंतर आम्ही...
डेझी मार्टिन यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमधून हा खुलासा केला. "14 वर्षे एकमेकांच्या आयुष्याचा भाग राहिल्यानंतर आम्ही विभक्त होत आहोत. हा प्रवास प्रेम, सामंजस्य आणि बदलांनी भरलेला होता. आम्ही मित्र, जीवनसाथी आणि पालक म्हणून आयुष्याचे विविध टप्पे एकत्र पार केले आहेत," असं डेझी मार्टिन यांनी म्हटलं आहे.
6/10
परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय
"आज, अधव अर्जुन आणि मी पती-पत्नी म्हणून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा आणि आपापल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे," असं डेझी मार्टिन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी आणि अधव आमच्या मुलांचे एकत्र संगोपन करण्यासाठी आणि त्यांचे सुख व कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असंही डेझी मार्टिन यांनी नमूद केलं आहे.
7/10
दोघांसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात
डेझी मार्टिन यांनी सोशल मीडियावरून केलेल्या या निवेदनात, "जरी ही आमच्या दोघांसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात असली तरी, आमच्या मुलांचे संगोपन करणे आणि त्यांचे सुख व कल्याण सुनिश्चित करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील," असं म्हटलं आहे.
8/10
मी अजूनही आधवचा खूप आदर करते
डेझी मार्टिन यांनी, मी अजूनही आधवचा खूप आदर करते. ती त्याला शुभेच्छा देते आणि भविष्यातील त्याचे सर्व प्रयत्न यशस्वी होवोत अशी प्रार्थना करते. डेझी मार्टिन यांनी खासगीपणाचं भान ठेवून आमच्या विभक्त होण्याबाबत गोपनीयता राखण्याची विनंतीही केली आहे.
9/10
स्वत: एक उद्योजिक
डेझी मार्टिन या स्वत: एक उद्योजिक आहेत. 'अराईज इन्व्हेस्टमेंट अँड कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड'च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून डेझी मार्टिन कार्यरत आहेत. वंचित समाजांना सुरक्षित आर्थिक मदत देण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात.
10/10
हीच ती पोस्ट
डेझी मार्टिन यांनी घटस्फोटासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेलं हेच ते निवेदन! (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार)