दिवाळीत एक दिवा यमराजासाठी लावला जातो. काय आहे यामागील परंपरा, तो दिवा कसा असवा, घरात कुठे लावावा जाणून घ्या A To Z माहिती.
दिवाळी 5 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या दिवाळीच्या दिवसात एक दिवशी यमराजासाठी एक खास प्रकराच दिवा लावला जातो.
1/8
दिवाळीत यमराजासाठी 'या' दिवशी लावा दिवा!
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. दिवाळात पाच महत्त्वाचे सण असतात. वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत दिवाळीचा उत्साह पाहिला मिळतो. या दिवाळातील धनत्रयोदशीच्या सणाला एक दिवा हा यमराजासाठी लावला जातो.
2/8
दिवाळीत यमराजासाठी 'या' दिवशी लावा दिवा!
दिवाळीतील या परंपरेला यमदीपदान असं म्हटलं जातं. धार्मिक शास्त्रानुसार कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य मिळावे आणि खास करून अकाली मृत्यू टाळण्यासाठी हा दिवा लावला जातो.
3/8
दिवाळीत यमराजासाठी 'या' दिवशी लावा दिवा!
हिंदू धर्मात प्रत्येक देवासाठी खास पूजा करण्यात येते. यमदेवता ही मृत्यू आणि कर्मदाता आहे. यमदेवतेला आनंद ठेवण्यासाठी दिवाळीत यमदीपदान करून प्रार्थना करण्यात येते.
4/8
दिवाळीत यमराजासाठी 'या' दिवशी लावा दिवा!
हा दिवा धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला लावला जातो. यंदा धनत्रयोदशी 6 नोव्हेंबर ला असून संध्याकाळी 6 ते 7:19 पर्यंतच्या दरम्यान हा दिवा लावावा.
5/8
दिवाळीत यमराजासाठी 'या' दिवशी लावा दिवा!
हा दिवा बनवण्याची आणि लावण्याची एक पद्धतदेखील आहे. हा दिवा गव्हाच्या पिठाचा असावा. या गव्हाच्या पिठात थोडी हळद टाकून चौमुखी दिवा बनवावा. त्यासोबत दोन मुटके बनवावे. यात चार वात आणि मोहरीचे तेल असावे.
6/8
दिवाळीत यमराजासाठी 'या' दिवशी लावा दिवा!
हा दिवा लावताना खाली तांदूळ घ्यावे मग त्यावर हा दिवा ठेवावा. मग या दिव्याला हळद- कुंकू, अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. या दिव्यात थोडे काळे तीळदेखील अर्पण करावे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)