• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /सामान्यांची 28 हजार कोटींची फसवणूक, 400 बँक खात्यांतून... मुंबई पोलीस, इन्कम टॅक्स ऑफिसर्सची सायबर चोरांना मदत? 12 सरकारी अधिकारी ED च्या रडारवर

सामान्यांची 28 हजार कोटींची फसवणूक, 400 बँक खात्यांतून... मुंबई पोलीस, इन्कम टॅक्स ऑफिसर्सची सायबर चोरांना मदत? 12 सरकारी अधिकारी ED च्या रडारवर

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 11:12 IST|Updated: Nov 10, 2026, 11:38 IST
joinshare
हादरवून टाकणारी बाब म्हणजे मुंबईत सुरु असलेल्या या साऱ्या प्रकाराच्या तपासाची चौकशी गोव्यातील एका प्रकरणावरुन झाली. नेमकी काय काय माहिती या प्रकरणी समोर आलीये पाहूयात...

ज्यांनी संरक्षण करायला हवं तेच भक्षक झाल्याची दाट शक्यता ईडीला वाटत असून यासंदर्भात तपास सुरु झाला आहे. नेमकी काय माहिती समोर येत आहे ते जाणून घेऊयात...

cyber crime1/9

सरकारी अधिकाऱ्यांकडून सामान्यांना 28 हजार कोटींचा गंडा?

हादरवून टाकणारी माहिती समोर आली असून या प्रकरणात थेट ईडीने तपास सुरु केलाय. नेमकं झालंय काय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
cybercrimmumbaied2/9

सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल शंका

देशभरातील हजारो कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात आता सरकारी अधिकाऱ्यांची भूमिकाही सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - फ्री पिक तसेच वृत्तसंस्थांकडून साभार)
cybercrimmumbaied3/9

12 हून अधिक सरकारी अधिकारी ईडीच्या रडारवर

सायबर गुन्हेगारांना मदत केल्याच्या संशयावरून मुंबईतील 12 हून अधिक सरकारी अधिकारी ईडीच्या रडारवर आले. यामध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास करणारे पोलीस अधिकारी, प्राप्तिकर विभाग आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
cybercrimmumbaied4/9

तक्रारींची नोंद घेण्यास टाळाटाळ

सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये वळवली जात होती, अशी काही खाती गोठवण्यात आल्यानंतर ती पुन्हा सुरू करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय आहे. काही अधिकाऱ्यांनी सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारींची नोंद घेण्यास टाळाटाळ केली.
cybercrimmumbaied5/9

गुन्हा दाखल करण्याऐवजी

काही प्रकरणांत पीडितांना गुन्हा दाखल करण्याऐवजी फसवणुकीतील काही रक्कम परत घेऊन प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिल्याचा संशय आहे. तसेच, फसवणुकीसाठी वापरली जाणारी बँक खाती गोठवल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
cybercrimmumbaied6/9

कुठून सुरू झाला प्रकरणाचा तपास?

संपूर्ण प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांनी 9 जून 2025 रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यापासून सुरू झाला. एका महिलेला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले होते.
cybercrimmumbaied7/9

2.60 कोटी रुपये उकळण्यात आले

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी महिलेला आणि तिच्या पतीला व्हिडीओ कॉलद्वारे सतत देखरेखीखाली ठेवले. त्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 2.60 कोटी रुपये उकळण्यात आले. या पैशांचा माग काढताना ईडीला देशभर पसरलेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे आढळले.
cybercrimmumbaied8/9

400 बँक खात्यांचा वापर

सुमारे 400 बँक खात्यांच्या माध्यमातून फसवणुकीची रक्कम विविध कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा संशय आहे. या कंपन्या कमोडिटी ट्रेडिंग, प्रवास आणि परकीय चलन विनिमय व्यवसायाशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
cybercrimmumbaied9/9

सुमारे 28 हजार कोटी रुपयांचे बँक व्यवहार?

या सायबर चोरांच्या नेटवर्कच्या माध्यमातून सुमारे 28 हजार कोटी रुपयांचे बँक व्यवहार झाल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - फ्री पिक तसेच वृत्तसंस्थांकडून साभार)
TAGS:
crime
Mumbai
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.