क्रिकेटच्या इतिहासामध्ये 149 वर्षानंतर पहिल्यांदाच नेमकं काय घडलंय आणि जे घडलंय ते इतकं खास का आहे? त्याची जगभरात चर्चा असण्याचं कारण काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
कसोटी क्रिकेटमधील ही ऐतिहासिक कामगिरी कोणत्याही प्रस्थापित दादा संघाने केलेली नसून एका छोट्याश्या संघाने केली आहे. याबद्दलच जाणून घेऊयात...
1/9
149 वर्षात पहिल्यांदाच... जागतिक क्रिकेटमध्ये एकच खळबळ
मोठ्या मोठ्या देशाच्या संघांना जे जमलं नाही ते एका लिंबू-टिंबू संघाने करुन दाखवल्याने जागतिक क्रिकेटमध्ये सध्या याच गोष्टीची चर्चा आहे. नेमकं झालंय काय पाहूनयात...
2/9
149 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं
कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 149 वर्षानंतर पहिल्यांदाच एक ऐतिहासिक विक्रम नोंदवण्यात आला आहे. खरं तर असा विक्रम करता येईल याचा यापूर्वी कोणी विचारही केला नसले.
3/9
झिम्बाब्वेच्या संघाने केलाय विक्रम
त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे हा विक्रम क्रिकेटची जन्मभूमि असलेल्या इंग्लंडच्या संघाने किंवा क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया अथवा न्यूझीलंडसारख्या अव्वल संघांनी केलेला नसून कसोटीमध्ये लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाने केला आहे.
4/9
कोणत्याही संघाला असा पराक्रम करता आलेला नाही
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झिम्बाब्वेचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळला. या सामन्याने झिम्बाब्वेच्या संघाने आपल्या दोन्ही डावांमध्ये 500 हून अधिक धावांचा डोंगर उभा करण्याचा विक्रम केलाय. यापूर्वी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही संघाला असा पराक्रम करता आलेला नाही.
5/9
10 धावांची आघाडी
शारजाह कसोटीमध्ये झिम्बाब्वेच्या संघाने पहिल्या डावात तुफान फटकेबाजी करत 504 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघानेही 514 धावांचा डोंगर उभा करत 10 धावांची आघाडी मिळवली. खरी कमाल तर यानंतर झाली जेव्हा झिम्बाब्वेने आपल्या दुसऱ्या डावामध्येही 5 विकेट्सच्या मोबदल्यात 523 धावा करत डाव घोषित केला.
6/9
असं पहिल्यांदाच झालं
अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच झालं आहे की एकाच संघाने एकाच सामन्यातील दोन डावांमध्ये 500 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात धावा झालेला हा सामना अनिर्णित राहिला. मात्र झिम्बाब्वेच्या संघाने केलेला विक्रम हा सुवर्ण अक्षरांनी क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला गेला आहे.
7/9
फलंदाजांचा दबदबा
या सामन्यातील धावांची संख्या पाहता सामन्यात फलंदाजांचा दबदबा राहिला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या सामन्यात एकूण सहा शतकं झळकावण्यात आली. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावामध्ये ब्रँडन टेलरने 131 धावांची तर ब्रायन बेनेटने 128 धावांची खेळी केली. या सामन्यासाठी ब्रँडन टेलरला 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं.
8/9
206 डावांची नाबाद खेळी
झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावामध्ये क्रेग इरविनने 206 डावांची नाबाद खेळी करत द्विशतक झळकावलं. द्विशतक झळकावणाऱ्या वयस्कर फलंदाजांच्या यादीत क्रेगने स्थान मिळवलं असून तो या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याच डावामध्ये वेस्ली मधेवेरेनेही नाबाद 100 धावांची खेळी केली. हे त्याच्या करिअरमधील पहिलं शतकं ठरलं.
9/9
25 विकेट्स पडल्या आणि 1541 धावा
दुसरीकडे अफगाणिस्तानकडून पहिल्या डावामध्ये रहमत शाह, सेदिकुल्लाह अटल आणि रहमानुल्लाह गुरबाज या तिघांनी शतकं झळकावली. पाच दिवसांच्या या सामन्यात 25 विकेट्स पडल्या आणि 1541 धावा करण्यात आल्या. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)