• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /4 घरं, 12 हून अधिक बँकेत पैसे, 16 कोटींचं कर्ज अन्... सतेज पाटलांची नेमकी संपत्ती किती? संपत्तीची A To Z तपशीलवार आकडेवारी समोर

4 घरं, 12 हून अधिक बँकेत पैसे, 16 कोटींचं कर्ज अन्... सतेज पाटलांची नेमकी संपत्ती किती? संपत्तीची A To Z तपशीलवार आकडेवारी समोर

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 11, 2026, 09:37 IST|Updated: Nov 11, 2026, 10:03 IST
joinshare
काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांची संपत्ती गोकुळ वादाच्या पार्श्वभूमीवर अचानक चर्चेत आली आहे ती चंद्रकांत पाटलांनी जाहीर भाषणात प्रपॉपर्टीचा उल्लेख करत केलेल्या टीकेमुळे. सतेज पाटलांची नेमकी संपत्ती किती? जाणून घेऊयात...

सतेज पाटलांनीच त्यांची संपत्ती विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या वेळेस घोषित केली होती. नेमकी त्यांच्याकडे किती घरं आहेत? किती जमीन आहे? पाहूयात...

satej patil property1/11

सतेज पाटलांची एकूण संपत्ती किती?

काँग्रेस आमदार सतेज पाटलांकडे किती घरं आहेत? त्यांच्याकडील शेत जमिनीची किंमत किती? बँकेत किती पैसे आहेत? सोनं किती आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती
satejpatilproperty2/11

चंद्रकांत पाटलांकडून सतेज पाटलांच्या संपत्तीचा उल्लेख

"डी. व्हाय. पाटील स्कूटरवरुन फिरायचे. आता तुमची संपत्ती किती? एवढी संपत्ती कुठून आली?" असं म्हणत 'गोकुळ'चा निकाल लागण्याआधीच मंगळवारी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसचे आमदार आणि समविचार आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या सतेज पाटलांवर निशाणा साधला. मात्र याच पार्श्वभूमीवर खरोखरच सतेज पाटलांची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात...
satejpatilproperty3/11

एक डझनहून अधिक बँकांमध्ये पैसे

सतेज पाटलांची एक डझनहून अधिक बँकांमध्ये 9 कोटी 45 लाखांहून अधिक संपत्ती असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यामध्ये कोल्हापुरातील बँकांबरोबरच मुंबईतील बँका आणि वित्त संस्थांचा समावेश आहे.
satejpatilproperty4/11

सतेज पाटलांकडे शेतजमीन किती कोटींची?

3 कोटींहून 69 लाखांहून अधिक किंमतीची शेत जमीन सतेज पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. बिगर शेतीच्या संपत्तीचं मूल्य 8 कोटी 33 लाखांहून अधिक आहे.
satejpatilproperty5/11

बॉण्ड्स आणि शेअर्समध्ये किती गुंतवणूक?

बॉण्ड्स आणि शेअर्समध्ये सतेज पाटलांनी 1 कोटी 70 लाखांहून अधिक पैसे गुंतवले आहेत. पोस्ट आणि राष्ट्रीय बचत निधीमध्ये त्यांनी 7 हजार 912 रुपये गुंतवलेत आहेत. एलआयसी आणि मॅक्स लाइफ या दोन विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी 2 कोटी 32 लाखांहून अधिकचा विमा घेतलाय.
satejpatilproperty6/11

सतेज पाटलांच्या नावावर चार घरं

सतेज पाटलांच्या नावावर चार घरं आहेत. यापैकी दोन घरं कोल्हापुरमध्ये असून दोन घरं मुंबईत आहेत. मुंबईतील एक घर पेडर रोडसारख्या उच्चभ्रू वस्तीत आहे. पत्नीच्या नावावर कोल्हापूरमध्ये घर असून सर्व घरांची एकूण किंमत 9 कोटी 55 लाखांहून अधिक आहे.
satejpatilproperty7/11

जंगम मालमत्ता किती?

सतेज पाटलांची जंगम मालमत्ता म्हणजेच चल संपत्ती (कॅश, गाड्या, सोनं इतर गोष्टी) 16 कोटी 33 लाख रुपये इतकी आहे.
satejpatilproperty8/11

स्थावर मालमत्ता किती?

तर स्थावर मालमत्तेचा म्हणजेच अचल संपत्तीबद्दल (जमीन, घरं इत्यादी) बोलायचं झाल्यास सतेज पाटलांकडे एकूण 21 कोटी 58 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
satejpatilproperty9/11

16 कोटी 54 लाखांचं कर्ज

सतेज पाटलांवर 16 कोटी 54 लाखांचं कर्ज असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. सतेज पाटलांनी त्यांच्याकडे टाटा सफारी कार असल्याचं सांगितलं असून तिची किंमत 27 लाख 7 हजार असल्याचं सांगितलं आहे.
satejpatilproperty10/11

सोनं आणि चांदी किती?

तसेच सोनं आणि चांदीसंदर्भातील माहितीही सतेज पाटलांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यांच्याकडे 396.520 ग्राम सोनं आहे. तर पत्नीकडे 230 ग्राम सोनं असून एकूण दागिन्यांची किंमत 23 लाख रुपये इतकी आहे.
satejpatilproperty11/11

एकूण घोषित मालमत्ता किती?

निवडणूक आयोगाकडे 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रानुसार, सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण घोषित मालमत्ता 40 कोटी 91 लाख 94 हजार 848 रुपये (सुमारे 41 कोटी रुपये) आहे. (सर्व फोटो सतेज पाटलांच्या फेसबुक अकाऊंटवरुन साभार)
TAGS:
Chandrakant Patil
Satej Patil
Kolhapur

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.