• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /घरातलं सोनं चोरीला गेलं तरी मिळते नुकसानभरपाई; पण कोणाला आणि कशी? त्यासाठी काय करावं लागतं? जाणून घ्या A To Z माहिती

घरातलं सोनं चोरीला गेलं तरी मिळते नुकसानभरपाई; पण कोणाला आणि कशी? त्यासाठी काय करावं लागतं? जाणून घ्या A To Z माहिती

Reported BySwapnil Ghangale
Published: Sep 30, 2026, 01:18 PM IST|Updated: Sep 30, 2026, 01:42 PM IST
joinshare
तुमच्या घरामध्येही बरचं सोनं आहे का? तुम्हीसुद्धा सोनं ठेवण्यासाठी बँक लॉकरचा वापर करत नसून घरातच सोनं ठेवलं असेल आणि तुम्हाला सोनं चोरीला जाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही ज्वेलरी इन्शुरन्ससंदर्भात जाणून घेतलं पाहिजे. ज्वेलरी इन्शुरन्स नेमकं काय असतं? यात कशासाठी कव्हर मिळतो आणि कशासाठी नाही? हे कसं काम करतं जाणून घ्या सविस्तर...

घरात ठेवलेल्या सोन्याचं इन्शुरन्स काढता येतं हे अनेकांना ठाऊकच नसतं. मात्र हे इन्शुरन्स कसं काम करतं आणि याचा कसा फायदा होऊ शकतो याबद्दलच इथं आपण जाणून घेणार आहोत. पाहूयात ज्वेलरी इन्शुरन्सची माहिती...

Gold Reserves1/9

कोणत्या देशात किती खासगी सोन्याचा साठा

भारतात घरातील सोन्याचा विचार केला तर 25000 ते 34,600 टन सोनं आहे. तर चीनकडे 28000 ते 31,000 टन सोनं आहे. त्याचप्रमाणे आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेकडे 26000 टन आणि जर्मनीकडे 9,100 टन सोनं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, वृत्तसंस्थांकडून साभार)
Gold Reserves2/9

कोणत्या परिस्थितीत इन्शुरन्स कव्हर नाकारले जाते?

दागिन्यांची नेहमीची झीज, साफसफाई किंवा दुरुस्तीदरम्यान झालेले नुकसान, तसेच चोरीचा कोणताही पुरावा नसताना अचानक दागिने गायब झाल्यास विम्याचा दावा नाकारला जाण्याची शक्यता अधिक असते.
Gold Reserves3/9

कोणत्या परिस्थितीत इन्शुरन्स कव्हर मिळते

घरात घरफोडी झाली, जबरी चोरी किंवा आगीसारख्या दुर्घटनेत झालेल्या नुकसानावर विमा संरक्षण मिळते. काही कंपन्या प्रवासात किंवा घराबाहेर असताना दागिने चोरीला गेल्यासही इन्शुरन्स कव्हर देतात. यासाठी दोन गोष्टी बंधनकारक असतात. पहिली गोष्ट म्हणजे दागिन्यांची मूळ पावती (बिल) आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दागिन्यांचे फोटो इन्शुरन्स क्लेमसाठी आवश्यक आहेत.
Gold Reserves4/9

पॉलिसीचा हप्ता आणि कव्हर किती?

प्रत्येक विमा कंपनीनुसार दागिन्यांच्या या पॉलिसीचा प्रीमियम (हप्ता) आणि मिळणारे संरक्षण (कव्हर) वेगवेगळे असते. घरातील मौल्यवान दागिन्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य कागदपत्रांसह 'हाउसहोल्डर पॉलिसी' घेणे हा एक सुरक्षित मार्ग मानला जातो.
Gold Reserves5/9

घरातील दागिन्यांचा विमा काढता येतो का?

घरातील सोन्याच्या तसेच इतर मौल्यवान दागिन्यांचा विमा काढता येतो, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. साधारणपणे जनरल इन्शुरन्स (सामान्य विमा) कंपन्या 'हाउसहोल्डर पॉलिसी' अंतर्गत दागिन्यांना विमा संरक्षण देतात.
Gold Reserves6/9

ज्वेलरी इन्शुरन्सबद्दल अनेकांना कल्पनाच नाही

मात्र, चोरी, घरफोडी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील दागिने गायब झाले किंवा अथवा खराब झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा वेळी 'ज्वेलरी इन्शुरन्स' (दागिन्यांचा विमा) अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. अनेकांना अशाप्रकारे आपल्या सोन्याच्या दागिन्यांचा विमा काढता येतो याचीच कल्पना नसते. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Gold Reserves7/9

दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात

खरं तर भारतात घरांमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्याची मोठी आणि फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. काही लोक सुरक्षेच्या दृष्टीने सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. मात्र आजही बहुतांश लोक सोन्याचे दागिने घरातच ठेवणे पसंत करतात.
Gold Reserves8/9

सर्वाधिक सोनं हे भारतात

प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या सोन्याचा विचार केला तर जगातील सर्वाधिक सोनं हे भारतात आहे, असं म्हटलं जातं. एका अंदाजानुसार अमेरिका, चीन यासारख्या देशांच्या राखीव सोन्याच्या साठ्यापेक्षाही अधिक सोनं भारतीयांच्या घरांमध्ये आहे.
Gold Reserves9/9

घरातून सोनं चोरीला गेलं तर मिळणार नुकसानभरपाई, पण कशी...

तुमच्या घरातील सोनं चोरीला गेलं, घरावर दरोडा पडला तर चोरीला गेलेल्या सोन्याची नुकसानभरपाई तुम्हाला मिळू शकते याची कल्पना आहे का? ही नुकसानभरपाई कशी मिळू शकते आणि यासाठी काय करावं लागतं जाणून घ्या सविस्तरपणे...
TAGS:
Gold Price
Insurance News
Business News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.