• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /कधी मॅगी खाऊन काढलेले दिवस, आज मनगटावर कोट्यवधी रुपयांचं घड्याळ बांधून फिरतो हार्दिक पांड्या, एकूण संपत्ती वाचून हैराण व्हाल

कधी मॅगी खाऊन काढलेले दिवस, आज मनगटावर कोट्यवधी रुपयांचं घड्याळ बांधून फिरतो हार्दिक पांड्या, एकूण संपत्ती वाचून हैराण व्हाल

Reported Bypooja pawar
Published: Oct 11, 2026, 01:18 PM IST|Updated: Oct 11, 2026, 01:26 PM IST
joinshare

Hardik Pandya Networth :  भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या हा 11 ऑक्टोबर 2026 रोजी 33 वर्षांचा झाला आहे. साधारण कुटुंबात जन्मलेल्या हार्दिक पांड्या हा आज क्रिकेटचा सुपरस्टार आहे. आज त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मात्र कधीकाळी हार्दिक पांड्यावर अशी वेळ होती की त्याला मॅगी खाऊन दिवस काढावे लागलेले. मागील काही काळापासून हार्दिक पांड्या हा दुखापतीने त्रस्त असल्याने त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. तेव्हा हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्ती विषयी माहिती जाणून घेऊयात. 

hardik pandya 1/7

hardik pandya

हार्दिक पांड्याचा सुरुवातीचा प्रवास हा खूप संघर्षपूर्ण होता. हार्दिकचे वडील हिमांशू पांड्या सुरतमध्ये कार फायनान्सचा व्यवसाय करत होते, परंतु त्यात मोठे नुकसान झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला वडोदरा येथे स्थलांतर करावे लागले. त्यांना अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती असल्याने हार्दिकला त्याचे शिक्षण सुद्धा सोडावं लागलं. हार्दिक आणि भाऊ कृणाल हे दोघे मॅगी नूडल्स खाऊन भूक भागवायचे.
hardik pandya 2/7

hardik pandya

हार्दिक पांड्याला आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याचं नशीब बदललं. आयपीएल पदार्पणाच्या काही महिन्यांनी हार्दिकची भारतीय संघात एंट्री झाली. त्यानंतर हार्दिकने आजतागायत मागे वळून पाहिलं नाही आणि तो भारताचा एक जबरदस्त ऑल राउंडर खेळाडू म्हणून पुढे आला आणि संघात एक अढळ स्थान मिळवले.
hardik pandya 3/7

hardik pandya

हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती ही जवळपास 95 ते 120 कोटींच्या घरात असून त्याला दरवर्षी बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टमधून 3 ते 5 कोटी रुपये मिळतात. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याला एका सीजनसाठी 16.35 कोटी रुपये मिळतात.
hardik pandya 4/7

hardik pandya

हार्दिक पांड्या हा अनेक ब्रॅण्ड्सचा चेहरा आहे. त्याला एखाद्या ब्रँड इन्डॉर्समेंटसाठी जवळपास 10 ते 15 कोटी रुपये मिळतात. हार्दिक पांड्याकडे जवळपास BoAt, Hyundai, Monster सारखे ब्रँड्स आहेत.
hardik pandya 5/7

hardik pandya

हार्दिक पांड्याकडे अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन सुद्धा आहे. यात फेरारी 12 सिलिंड्री 8.5 से 12 कोटी रुपये, रोल्स रॉयस फँटम 8.99 से 10.48 कोटी रुपये, लेम्बोर्गिनी उरुस एसई 5.5 कोटी रुपये, लँड रोवर रेंज रोवर SV 3.32 कोटी रुपये यासह अनेक गाड्यांचं कलेक्शन आहे.
hardik pandya 6/7

hardik pandya

हार्दिक पांड्याकडे रिचर्ड मिल (Richard Mille RM 56-03 ब्लू सफायर) हे सर्वात महागडं घड्याळ असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घड्याळाची किंमत ही जवळपास 45 कोटी असल्याची माहिती आहे. तसेच पाटेक फिलिप नॉटिलस (Patek Philippe Nautilus Emerald / Platinum) हे घड्याळ सुद्धा हार्दिककडे आहे ज्याची किंमत ही जवळपास 5 ते 8 रुपये आहे.
hardik pandya 7/7

hardik pandya

हार्दिक पांड्याने रिअल इस्टेटमध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक केलेली असून मुंबईच्या खार येथील भागात एका आलिशान इमारतीत त्याचं घर आहे. या घराची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे. वरळीमध्ये सुद्धा हार्दिकने नवा फ्लॅट घेतला असल्याची चर्चा असून मीडिया रिपोर्ट्सनुसार 21.45 कोटींना हार्दिकने हे डील केलेलं आहे. याशिवाय हार्दिकचं वडोदरा येथे सुद्धा एक घर आहे.
TAGS:
Hardik Pandya
Cricket News
Marathi News
News in Marathi
Marathi Batmya

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.