Hardik Pandya IPL 2027 : हार्दिक पांड्या आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियंसची साथ सोडून पंजाब किंग्समध्ये सामील झालाय. 2015 मध्ये पहिली आयपीएल खेळलेल्या हार्दिकने आयपीएल खेळून कोट्यवधींची संपत्ती मिळवली आहे.
1/6
हार्दिक पांड्या हा ट्रेड होऊन पंजाब किंग्समध्ये गेला
इंडियन प्रीमियर लीग 2027 पूर्वी हार्दिक पांड्या हा ट्रेड होऊन पंजाब किंग्समध्ये गेला आहे. तर पंजाब किंग्सने आपला स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहला मुंबई इंडियन्सकडे पाठवलंय. हार्दिक हा तब्बल १८ कोटींची मोठी रक्कम घेऊन पंजाबमध्ये गेलाय. त्याला मुंबई इंडियन्सचा भाग असताना 16.5 कोटी रुपये मिळायचे. त्यामुळे यंदा त्याच्या आयपीएल मानधनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.5 कोटींची वाढ झाली आहे.
2/6
2015 पासून आयपीएल खेळतोय.
हार्दिक पांड्या हा जवळपास 2015 पासून आयपीएल खेळतोय. आयपीएलमधून त्याची आतापर्यंतची कमाई ही जवळपास 140 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 2015 मध्ये केवळ १० लाख रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टवर हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील प्रवास सुरु झालेला. मात्र त्यानंतर त्याने यशाची अनेक शिखरं गाठली.
3/6
10 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी करण्यात आलं होतं
2015 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने अनकॅप्ड ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला 10 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी करण्यात आलं होतं. पुढील तीन सीजनमध्ये 2015, 2016 आणि 2017) हार्दिक याच 10 लाख रुपयांच्या करारांतर्गत खेळत राहिला. या काळात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अनेकदा मुंबईला सामना जिंकून दिला. मुंबई इंडियन्सला दोनदा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
4/6
11 कोटी रुपयांच्या मानधनावर खेळला
2018 च्या मेगा ऑक्शनपूर्वी हार्दिकला मुंबई इंडियन्सने 11 कोटींच्या मानधनावर रिटेन केलं होतं. 2018 ते 2021 या काळात तो दर सिजनसाठी 11 कोटी रुपयांच्या मानधनावर सातत्याने खेळला. या कालावधीत मुंबईने सलग दोनदा 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले आणि हार्दिक जगातील सर्वात घातक 'फिनिशर्स'पैकी एक म्हणून समोर आला.
5/6
हिल्याच सीजनमध्ये गुजरातला चॅम्पियन बनवले
2022 मध्ये गुजरात टायटन्स हा नवा संघ आयपीएलमध्ये आला. तेव्हा त्यांनी हार्दिक पांड्याला ड्राफ्टमध्ये 15 कोटींना सामील केले. कर्णधार म्हणून हार्दिकने आपल्या पहिल्याच सीजनमध्ये गुजरातला चॅम्पियन बनवले तर 2023 मध्ये संघ उपविजेता ठरला. या दोन सिजनमध्ये त्याने एकूण 30 कोटी रुपये कमावले.
6/6
तीन वर्षासाठी प्रति 16.5 कोटी रुपये
2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं. यावेळी त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आलं. 2024 पासून ते 2026 पर्यंत तीन वर्षासाठी प्रति 16.5 कोटी रुपये रुपये मिळाले. तर आता पंजाबमध्ये गेल्यावर हार्दिक पांड्याला एका आयपीएल सीजनसाठी 18 कोटींचं मानधन मिळणार आहे.