/5 वर्ष 'लिव्ह-इन'नंतर लग्न, पालकांना नात्याची कल्पना पण लग्नानंतर...; कोर्टाचा पालकांना धक्का, पोलिसांनाही दिले आदेश! 21 वर्षीय मुंबईकर तरुणीसंदर्भातील प्रकरण काय?
5 वर्ष 'लिव्ह-इन'नंतर लग्न, पालकांना नात्याची कल्पना पण लग्नानंतर...; कोर्टाचा पालकांना धक्का, पोलिसांनाही दिले आदेश! 21 वर्षीय मुंबईकर तरुणीसंदर्भातील प्रकरण काय?
मुंबई उच्च न्यायालयाने एका 21 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नेमकं काय म्हटलंय न्यायालयाने जाणून घेऊयात...
मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल पालकांसाठी धक्का असल्याचं मानलं जात आहे. पालकांचा संदर्भ देत तरुणीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने काय म्हटलंय जाणून घ्या...
1/9
सज्ञान तरुणीला जोडीदार...; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला असून या तरुणीला कोर्टाने दिलासा दिलाय. नेमकं हे प्रकरण काय? कोर्टाने काय म्हटलंय जाणून घ्या...
2/9
आपला जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य
कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही श्रद्धा, विश्वास, धर्म किंवा जातीच्या व्यक्तीला आपला जोडीदार म्हणून निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. या कायदेशीर स्थितीबाबत कोणताही वाद नाही. या प्रकरणातील याचिकाकर्ती देखील सज्ञान असून तिला तिच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
3/9
21 वर्षांच्या तरुणीची उच्च न्यायालयात धाव
आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्याला पालकांकडून विरोध होऊ शकेल, या भीतीपोटी एका 21 वर्षांच्या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, जोडप्याला पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. या तरुणीच्या याचिकेच्या निमित्ताने न्यायमूर्ती अद्वैत सेठना आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवलं आहे.
4/9
कोणताही दबाव टाकला जाऊ शकत नाही
सज्ञान तरुणीला स्वतःच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा आणि त्याच्याबरोबर जीवन व्यतित करण्याचा अधिकार आहे. या निर्णयासाठी तिच्यावर कोणताही दबाव टाकला जाऊ शकत नाही किंवा बळजबरी केली जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केले.
5/9
कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्यवाही करण्याचे आदेश
पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्यवाही करण्याचे आणि याचिकाकर्तीच्या विनंतीचा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 21चा एक अविभाज्य भाग असल्याचेही न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देताना नमूद केले.
6/9
स्वतःचा निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र
सज्ञान असल्याने ती कोणत्याही बळजबरीशिवाय किंवा दवावाशिवाय यासंदर्भात स्वतःचा निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. सुमारे पाच वर्षे लिव्ह-इन नातेसंबंधात राहिल्यानंतर, 19 ऑक्टोबर 2026 रोजी याचिकाकर्तीने जोडीदाराशी विवाह केला होता.
7/9
दोघांच्या पालकांना या संबंधांची माहिती होती
याचिकाकर्तीच्या दाव्यानुसार, दोघांच्या पालकांना या संबंधांची माहिती होती. तथापि, पालकांकडून विवाहाला विरोध होऊ शकतो या भीतीने जोडप्याने विवाहानंतर लगेचच, धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे त्यांनी त्यांच्या विवाहाची माहिती देऊन, संरक्षणाची मागणी केली होती.
8/9
पोलिसांच्या वर्तनाबाबत याचिकेत शंका
याचिकाकर्तीने पोलिसांच्या वर्तनाबाबत याचिकेत शंका व्यक्त केली होती. परंतु, प्रकरणाच्या या टप्प्यावर, त्याचाबत कोणतेही भाष्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही. पोलीस प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहून आणि पूर्णपणे कायद्यानुसारच काम करेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (सर्व फोटो प्रातिनिधिक, 'फ्रिपीक'वरुन साभार)
9/9
पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयात धाव
मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकाकर्तीने न्यायालयात सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करण्याचे आणि याचिकाकर्तीच्या विनंतीचा विचार करण्याचे आदेश दिले.