• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /कोकणात अवतरलं 'मिनी लंडन'! चिपळूणजवळील निसर्गरम्य 'लंडन रोड' ठरतोय पर्यटकांचे नवे आकर्षण

कोकणात अवतरलं 'मिनी लंडन'! चिपळूणजवळील निसर्गरम्य 'लंडन रोड' ठरतोय पर्यटकांचे नवे आकर्षण

Reported ByVanita Kamble
Published: Nov 27, 2026, 00:08 IST|Updated: Nov 27, 2026, 00:12 IST
joinshare
झी २४ तासचे रत्नागिरीचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी या ठिकाणाला प्रत्यक्षात भेट दिली आहे. इथलं सुंदर निसर्ग सौंदर्य त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

चिपळूण : कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या चिपळूण तालुक्यात चक्क 'लंडन रोड' असल्याचे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. मात्र, हा कोणताही परदेशातील रस्ता नसून चिपळूण शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेला गोवळकोट ते कालुस्ते दरम्यानचा अत्यंत विलोभनीय असा खाडीकिनारी मार्ग आहे.

konkan1/8

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला हा परिसर सध्या पर्यटकांसाठी एक 'हिडन जेम' (लपलेला खजिना) ठरत असून,कोकण पर्यटनाला यातून मोठी चालना मिळत आहे.

konkan2/8

या रस्त्याला अधिकृतरीत्या 'लंडन रोड' असे नाव नसले,तरी स्थानिकांमध्ये हे नाव प्रचंड प्रचलित आहे.पूर्वी या परिसरातील अनेक रहिवासी नोकरी व व्यवसायानिमित्त परदेशात, विशेषतः लंडनला स्थायिक होते.मायदेशी परतताना ते याच मार्गावरून आपल्या गावी जात असत.

konkan3/8

या मार्गावरून प्रवास करताना लागणारी शांतता, दुतर्फा पसरलेली हिरवळ आणि वाशिष्ठी खाडीचे विहंगम दृश्य पाहून परदेशातील किंवा गोव्यातील निसर्गरम्य रस्त्यांचा भास होतो.त्यामुळेच स्थानिकांनी या रस्त्याला प्रेमाने 'लंडन रोड' असे नाव दिले आहे..

kokan4/8

ऐतिहासिक गोवळकोट किल्ला आणि गोवळकोट धक्क्याच्या पलीकडून कालुस्ते गावाच्या दिशेने जाणारा हा रस्ता वाशिष्ठी नदीच्या खाडीकिनारी वसलेला आहे.

konkan5/8

एका बाजूला संथ वाहणारी वाशिष्ठी खाडी,तर दुसऱ्या बाजूला दाट नारळी-पोफळीच्या बागा असे मनमोहक चित्र येथे पाहायला मिळते.शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या रस्त्यावर निसर्गाचा अद्भुत अविष्कार अनुभवायला मिळतो.

konkan6/8

कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी केवळ प्रसिद्ध समुद्रकिनारे न पाहता,चिपळूणजवळील या 'लंडन रोड'ला अवश्य भेट द्यावी,असे आवाहन स्थानिकांकडून केले जात आहे. या भागात पर्यटकांचा ओघ वाढल्यास स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.

konkan7/8

निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी,निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा परिसर उत्तम पर्याय बनला आहे.

konkan8/8

सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी या रस्त्यावरून फेरफटका मारणे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.

TAGS:
Maharashtra Tourism
Kokan
Ratnagiri

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.