• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /रोज तब्बल ₹7 कोटींचा तोटा... घाईत घेतलेल्या एका निर्णयामुळे ST ने गमावले ₹240 कोटी! प्रवाशांना एसटी नकोशी होण्याचं एकच कारण

रोज तब्बल ₹7 कोटींचा तोटा... घाईत घेतलेल्या एका निर्णयामुळे ST ने गमावले ₹240 कोटी! प्रवाशांना एसटी नकोशी होण्याचं एकच कारण

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 14:02 IST|Updated: Nov 13, 2026, 14:33 IST
joinshare
राज्य परिवहन महामंडळाने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतलीये की काय असा सवाल आता विचारला जातोय तो एका महत्त्वाच्या निर्णयामुळे. हा निर्णय काय नेमकं झालंय काय जाणून घ्या...

एसटी बसला महिन्याभरात झालेल्या एकूण तोट्याची थक्क करणारी आकडेवारी समोर आली असून यासाठी नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. नेमकं झालंय काय जाणून घेऊयात...

st bus news1/8

रोज सात कोटींचा तोटा...

एसटी महामंडळाचा असा कोणता निर्णय आहे ज्यामुळे रोज त्यांना जवळपास सात कोटींचा तोटा होतोय जाणून घ्या सविस्तरपणे...
stbusncmccard2/8

तोटा 240 कोटी रुपयांहून अधिक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तोटा ऑक्टोबर महिन्यात 240 कोटी रुपयांहून अधिक झाला असून, सप्टेंबरच्या तुलनेत त्यात 150 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
stbusncmccard3/8

दररोजचा तोटा सात कोटी

या आकडेवारीनुसार, दिवसाचा हिशोब केल्यास एसटीचा दररोजचा तोटा सात कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
stbusncmccard4/8

एसटीच्या उत्पन्नावर परिणाम

एनसीएमसी स्मार्ट कार्डची घाईघाईने लागू केलेली सक्ती आणि व्यवस्थापनाचे नियोजनशून्य निर्णय यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
stbusncmccard5/8

एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती, मात्र...

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आली, मात्र कार्डची उपलब्धता आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय लागू करण्यात आला.
stbusncmccard6/8

कार्ड असलेल्या महिला प्रवासी किती?

राज्यातील केवळ 43 टक्के महिला प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड असताना सक्ती केल्याने उर्वरित महिलांना प्रवासात अडचणी आल्या.
stbusncmccard7/8

एसटीकडे पाठ फिरवल्याचा दावा

त्यामुळे महिला प्रवाशांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनीही एसटीकडे पाठ फिरवल्याचा दावा बरगे यांनी केला. संबंधितांवर कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
stbusncmccard8/8

सक्ती करण्याची घाई महागात पडली

एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती करण्याची घाई एसटी प्रशासनाच्या अंगलट आली आहे. या एका चुकीमुळे एसटीला रोज सात कोटींचा फटका होतोय हे किमान ऑक्टोबरच्या आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसतंय. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य सोशल मीडियावरुन साभार)
TAGS:
Maharashtra News
Marathi News
News in Marathi
Marathi Batmya

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.