मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाढणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरत आहे.
मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका अधिक आहे.
1/7
मुंबईतील प्रदूषण कमी झाले, पण तो धोका कायम; श्वासात अतिसूक्ष्म कण...
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काहीसा आटोक्यात आल्याचे दिसत असले, तरी हवेतील अतिसूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अद्याप आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर आहे
2/7
निर्देशांक 172
लक्ष्मीपूजनानंतर मुंबईची हवा विषारी बनली होती. फाटाक्यामुळं मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झाले होते. मुंबईचा सरासरी निर्देशांक 172 नोंदवण्यात आला होता.
3/7
प्रदूषणाचे स्वरूप
यंदाच्या वर्षी तुलनेत हवेची गुणवत्ता सुधारल्याचे चित्र असले, तरी प्रदूषणाचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
4/7
घातक घटक
हवेतील विविध प्रदूषक घटकांचा विचार करून आकडा दिला जातो. त्यामुळे हा आकडा कमी झाला म्हणजे हवेतले सर्व घातक घटक कमी झाले, असे म्हणता येत नाही.
5/7
निर्देशांक मध्यम श्रेणी
निर्देशांक मध्यम श्रेणीत असला तरी दमा, फुप्फुसाचे आजार किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो.
6/7
2.5 या सूक्ष्म प्रदूषक
हवेतील पीएम 2.5 कणांच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण 2.5 या सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण मानवी आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे.
7/7
रक्तप्रवाहातही प्रवेश
हे कण अतिशय लहान असल्याने श्वासावाटे सहजपणे फुफ्फुसांमध्ये पोहोचतात. एवढेख नव्हे, तर ते रक्तप्रवाहातही प्रवेश करू शकतात.