• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /रोपवेसाठी मुंबईच्या फुफ्फुसांवर कुऱ्हाड? मोठ्या प्रमाणात वृक्षतोड अटळ? 'या' 2 उपनगरांना कनेक्ट करणारा प्रोजेक्ट नेमका काय?

रोपवेसाठी मुंबईच्या फुफ्फुसांवर कुऱ्हाड? मोठ्या प्रमाणात वृक्षतोड अटळ? 'या' 2 उपनगरांना कनेक्ट करणारा प्रोजेक्ट नेमका काय?

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 07:53 IST|Updated: Nov 09, 2026, 08:25 IST
joinshare
मुंबईमधील दोन महत्त्वाचे भाग या रोपवेच्या माध्यमातून जोडली जाणार असल्याचं सांगितलं जात असून यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्या असून सदर प्रकल्पाबद्दल एक निविदाही काढण्यात आली आहे.

मुंबईची फुफ्फुसं अशी ओळख असलेल्या जंगलावर संक्रात येण्याची दाट शक्यता असून ज्या प्रोजेक्टमुळे अशी शंका उपस्थित केली जात आहे तो प्रोजेक्ट आहे तरी कसा? जाणून घेऊयात सविस्तरपणे...

ropeway forest news1/11

मुंबईच्या फुफ्फुसांवर पडणार कुऱ्हाड?

मुंबईमध्ये रोपवे प्रकल्प आणण्यासंदर्भात हलचाली सुरु करण्यात आल्या आहेत. नेमका हा प्रकल्प आहे कुठे आणि कसा? त्याला पर्यावरणवाद्यांचा का विरोध होतोय जाणून घ्या ए टू झेड माहिती... (सर्व फोटो प्रातिनिधिक)
ropewaymumbaiforest2/11

पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत रोपवे

मुंबईची फुफ्फुसं अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) अतिसंरक्षित वनक्षेत्रात रोपवे बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. मुलुंड ते बोरिवलीदरम्यान हा रोपवे बांधला जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
ropewaymumbaiforest3/11

सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार

या रोपवे प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे.
ropewaymumbaiforest4/11

सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध

व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाल्यानंतर या रोपवे प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील अतिसंरक्षित वनक्षेत्रात रोपवे बांधला जाणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांनी दिली.
ropewaymumbaiforest5/11

निविदा काढल्या जातील

रोपवे प्रकल्प व्यवहार्य ठरल्यानंतर आराखडा तयार करून त्यानंतर बांधकामासाठी निविदा काढल्या जातील. तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्प मार्गी लागण्यासाठी बराच काळ लागेल
ropewaymumbaiforest6/11

अद्याप प्रस्ताव नाही

राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांच्याकडे विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
ropewaymumbaiforest7/11

यासंबंधीची माहिती आमच्याकडे नाही

राष्ट्रीय उद्यानात पायाभूत सुविधा विकसित करण्याची कामे इतर यंत्रणांकडून केली जातात. त्यानुसार हे काम केले जाणार आहे. मात्र अद्याप यासंबंधीची माहिती आमच्याकडे नाही, असे राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील म्हणाल्या.
ropewaymumbaiforest8/11

पर्यवारणवाद्यांचा विरोध

उद्यानाच्या पर्यटनास चालना देण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रकल्प आणला आहे, पण आता या प्रकल्पास पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
ropewaymumbaiforest9/11

राष्ट्रीय उद्यान उद्ध्वस्त करण्याचा घाट

सदर रोपवे प्रकल्प म्हणजे आरे जंगलापाठोपाठ राष्ट्रीय उद्यानही उद्ध्वस्त करण्याचा हा घाट असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. हा प्रकल्प अतिसंरक्षित वनक्षेत्रात केला जाणार असल्याने येथील नैसर्गिक अधिवासाला धक्का बसणार आहे.
ropewaymumbaiforest10/11

परिणाम येथील प्राणी, पक्ष्यांवर होणार

ज्या क्षेत्रात ड्रोन उडवण्यासही बंदी आहे, अशा क्षेत्रात थेट रोपवेचा घाट घातला जात आहे. त्याचा परिणाम येथील प्राणी, पक्ष्यांवर होणार असल्याचे वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले.
ropewaymumbaiforest11/11

प्रकल्प मार्गी लागण्यासाठी बराच काळ

विभागाच्या गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांनी दिली. प्रकल्प व्यवहार्य ठरल्यानंतर आराखडा तयार करून त्यानंतर बांधकामासाठी निविदा काढल्या जातील. तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्प मार्गी लागण्यासाठी बराच काळ लागेल. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - फ्री पिकवरुन साभार)
TAGS:
Mumbai
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.