BCCI Selection Committee Head : भारताचा माजी चीफ सेलेक्टर अजित आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर रोजी संपला असून यावेळी बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने आता चीफ सिलेक्टर पदासाठी नव्याने ऍप्लिकेशन मागवले असून असं मानलं जात होतं की यासाठी पार्थिव पटेल अप्लाय करेल आणि तो चीफ सिलेक्टर होईल अशी चर्चा होती.
1/7
सिलेक्शन कमिटीचं प्रमुख पद :
अजित आगरकर यांच्यानंतर आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी सिलेक्शन कमिटीच्या प्रमुख पदावर कोण येणार याची जोरदार चर्चा होती. या दरम्यान अचानकपणे माजी क्रिकेटर पार्थिव पटेल याचं नाव चर्चेत आलं.
2/7
पार्थिव पटेलने कोणताही अर्ज केला नाही :
4 ऑक्टोबर रोजी अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यावर बीसीसीआयने नुकतेच नव्या सिलेक्टर कमिटीच्या प्रमुखासाठी अर्ज मागितले होते. मात्र या सगळ्यात चर्चा होत असलेल्या पार्थिव पटेलने कोणताही अर्ज केला नाही.
3/7
पार्थिव पटेल हा गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफसोबतच
14 ऑक्टोबर हा चीफ सिलेक्टर पदासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र यादिवसापर्यंत पार्थिव पटेलने अर्ज केला नाही. याचा अर्थ असा की सध्या पार्थिव पटेल हा गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफसोबतच काम करेल.
4/7
पार्थिवचं नाव वगळलं
पार्थिवचे नाव वगळण्यात आल्यामुळे, माजी स्पिनर प्रज्ञान ओझा आता मुख्य निवडकर्त्याची भूमिका स्वीकारू शकतात. प्रज्ञान ओझा हे आधीच सिलेक्शन कमिटीचे सदस्य आहेत.
5/7
प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला प्रज्ञान
सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्ट सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला प्रज्ञान हा सध्याच्या सिलेक्शन कमिटीतील सर्वात अनुभवी माजी टेस्ट खेळाडू आहे. त्याने 24 टेस्ट सामने खेळले आहेत आणि त्यामुळेच या भूमिकेत त्याचा विचार केला जाऊ शकतो.
6/7
तात्पुरते चीफ सिलेक्टर म्हणून काम
अजित आगरकर यांची कारकीर्द संपल्यावर सिलेक्शन कमिटीचे सदस्य असलेले प्रज्ञान ओझा हे सध्या तात्पुरते चीफ सिलेक्टर म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांनी मागील काही काळापासून अजित आगरकर यांच्या नेतृत्वात सिलेक्टर कमिटीमध्ये काम सुद्धा केलं आहे.
7/7
प्रज्ञान ओझा कारकीर्द
प्रज्ञान ओझा सध्या 40 वर्षांचा असून टेस्टमध्ये 24, वनडेत 18, टी२० मध्ये 6 तर आयपीएलमध्ये 92 सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये प्रज्ञानने 113 विकेट्स, वनडेत 21 विकेट्स, टी२० मध्ये त्याने 10 विकेट सुद्धा घेतले. तर आयपीएलमध्ये प्रज्ञानच्या नावावर 89 विकेट्स आहेत.