• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय, गेल्या 3 वर्षात तब्बल...; हादरवणारी आकडेवारी समोर

मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय, गेल्या 3 वर्षात तब्बल...; हादरवणारी आकडेवारी समोर

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 14, 2026, 02:13 PM IST|Updated: Oct 14, 2026, 02:24 PM IST
joinshare
काळ जस जसा बदलतो तशा सवयी व जीवनशैलीदेखील बदलते. त्याचा आरोग्यावर नकळतपणे परिणाम होतो. आजकाल लहान मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

जंक फूड, फास्ट फूड यामुळं लहान मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहे. अलीकडेच समोर आलेल्या आकडेवारीतून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 

Obesity among children is increasing in Mumba1/7

बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

मुंबईतील बाई जेरबाई वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षांत बालकांमधील लठ्ठपणाच्या जवळपास 300 प्रकरणांची नोंद झाली आहे.
Obesity among children is increasing in Mumba2/7

मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

दरवर्षी सरासरी 100 नवीन रुग्ण येत आहेत. हा आजार आता फक्त उच्चवर्गीय कुटुंबांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सर्व आर्थिक स्तरांतील मुलांमध्ये वाढत आहे.
Obesity among children is increasing in Mumba3/7

मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

परेळ येथील वाडिया हॉस्पिटल हे राज्य सरकार आणि बीएमसी यांच्या सहकार्याने चालते. येथे निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील रुग्णही येतात. डॉ. सुधा राव, वैद्यकीय संचालक आणि बालरोग अंतःस्राव तज्ज्ञ यांच्या मते, 80 टक्क्यांहून अधिक प्रकरणे जीवनशैलीशी संबंधित आहेत.
Obesity among children is increasing in Mumba4/7

बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

हार्मोनल किंवा अनुवांशिक कारणे फार कमी आहेत.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-6) नुसारही भारतात लठ्ठपणा वाढतोय. 15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये हा दर 24 टक्क्यांवरून 30.7 टक्क्यांवर गेला आहे.
Obesity among children is increasing in Mumba5/7

मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

पुरुषांमध्येही 22.9 टक्क्यांवरून 27.3 टक्क्यांवर वाढ झाली आहे. भारत लठ्ठपणाच्या बाबतीत चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Obesity among children is increasing in Mumba6/7

मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

तज्ज्ञ सांगतात की, साखरयुक्त पेये, प्रक्रिया केलेले पदार्थ, बाहेर खेळण्याची कमी वेळ आणि जास्त स्क्रीन टाइम यामुळे मुलांचे वजन वाढते. पालकांना वाटते की लठ्ठपणा हार्मोनल समस्येमुळे होतो, पण बहुतांश वेळा तसे नसते
Obesity among children is increasing in Mumba7/7

मुंबईत बालकांमधील लठ्ठपणा वाढतोय

लठ्ठपणामुळे इन्सुलीन रेझिस्टन्स, प्रीडायबेटीस, टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, फॅटी लिव्हर, झोपेचे विकार आणि सांध्यांचे दुखणे होऊ शकते. किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओएससारखी लक्षणेही दिसू शकतात.
TAGS:
Health News
Lifestyle News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.