• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /'रामायण'ची फक्त 3 दिवसांत 375 कोटींची कमाई; शनिवारच्या कमाईने रचला नवा रेकॉर्ड, परदेशातही डंका

'रामायण'ची फक्त 3 दिवसांत 375 कोटींची कमाई; शनिवारच्या कमाईने रचला नवा रेकॉर्ड, परदेशातही डंका

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 14:56 IST|Updated: Nov 08, 2026, 15:03 IST
joinshare
रणबीर कपूर आणि यश यांच्या 'रामायण: पार्ट वन' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जगभरात अंदाजे 182.70 कोटींची कमाई केली.

परदेशातही चित्रपटाला मोठं यश मिळत आहे.
 

Ramayana Box Office Collection1/7

शनिवारी मोठी उसळी

नितीश तिवारी यांचा 'रामायण: पार्ट वन' बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाल्यानंतर, रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी मोठी उसळी घेतली.
Ramayana Box Office Collection2/7

तिसऱ्या दिवशी 68.80 कोटी रुपयांची निव्वळ कमाई

तिसऱ्या दिवशी भारतात या चित्रपटाने 68.80 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली, जी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक कमाई ठरली आहे.
Ramayana Box Office Collection3/7

जागतिक स्तरावर 375.50 कोटींची कमाई

यामुळे चित्रपटाची भारतातील तीन दिवसांची एकूण निव्वळ कमाई 182.70 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ट्रेड ट्रॅकर 'सॅकनिल्क' (Sacnilk) नुसार, चित्रपटाची जागतिक स्तरावरील एकूण कमाई 375.50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
Ramayana Box Office Collection4/7

शुक्रवारी 48.05 कोटी रुपयांची निव्वळ कमाई

चित्रपटाने शुक्रवारी 48.05 कोटी रुपयांची निव्वळ कमाई झाली होती, त्या तुलनेत शनिवारी चित्रपटाच्या भारतीय निव्वळ कमाईत 45.3 टक्क्यांची वाढ दिसून आली. शनिवारी भारतातील एकूण कमाई 83.85 कोटी रुपये इतकी होती. यासह, भारतातील चित्रपटाची एकूण कमाई 218.25कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
Ramayana Box Office Collection5/7

पहिल्या दिवशी 64.85 कोटी रुपयांची कमाई

शनिवारची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पहिल्या दिवशी 64.85 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, शुक्रवारी चित्रपटाच्या निव्वळ कमाईत 25.9 टक्क्यांची घट झाली होती.
Ramayana Box Office Collection6/7

परदेशातही मोठं यश

परदेशातील बाजारपेठांनीही या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा उचलला आहे. 'रामायण'ने तिसऱ्या दिवशी परदेशात अंदाजे 60 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे परदेशातील एकूण कमाई 157.25 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आता या चित्रपटाची तीन दिवसांतील जागतिक स्तरावरील एकूण कमाई 375.50 कोटी रुपये इतकी झाली आहे.
Ramayana Box Office Collection7/7

हिंदी आवृत्ती आघाडीवर

चित्रपटाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस कामगिरीमध्ये हिंदी आघाडीवर आहे. शनिवारी हिंदी आवृत्तीने 53 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी कन्नड आवृत्तीने 6.30 कोटी रुपये, तर तेलुगू आवृत्तीने 6 कोटी रुपयांची कमाई केली. तमिळ आवृत्तीने 2.50 कोटी रुपये आणि मल्याळम आवृत्तीने 2 कोटी रुपयांची कमाई शनिवारी नोंदवली. पाचही भाषा मिळून, चित्रपटाची भारतातील तिसऱ्या दिवसाची निव्वळ कमाई 69.80 कोटी रुपये इतकी झाली असून, तीन दिवसांची एकूण निव्वळ कमाई 182.70 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
TAGS:
Entertainment News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.