• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /किती मोठा असणार शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट? 20 वर्षात पहिल्यांदाच असं होणार

किती मोठा असणार शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट? 20 वर्षात पहिल्यांदाच असं होणार

Reported Bypooja pawar
Published: Nov 26, 2026, 22:15 IST|Updated: Nov 26, 2026, 22:23 IST
joinshare

Shah Rukh Khan King Movie Duration : अभिनेता शाहरुख खान हा मोठ्या पडद्यावर तीन वर्षांनी आपला नवा सिनेमा घेऊन येत आहे. त्याचा चित्रपट 'किंग' ची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा असून चित्रपट कधी रिलीज होतोय याची चाहत्यांना उत्सुकतता लागला आहे. अशातच 'किंग' या चित्रपटाच्या रनटाइमचा खुलासा करण्यात आला असून हा चित्रपट नेमका किती वेळचा असणार हे समोर आलंय. 

King Movie Duration 1/6

'किंग' चं रन टाइम :

किंगच्या रन टाइमबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार किंग चित्रपटाच्या रनटाइमबाबत मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध अमेरिकन मूवी टिकटिंग वेबसाईट Fandango च्या रिपोर्टनुसार किंग चित्रपटाचा रनटाईम हा 3 तास 17 मिनिटं असणार आहे.
King Movie Duration 2/6

20 वर्षातील शाहरुख खानची तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालणारा चित्रपट

किंग चित्रपटाच्या रन टाईमवर जर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला तर ही मागच्या 20 वर्षातील शाहरुख खानची तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालणारा चित्रपट असेल. याआधी शाहरुख खानचा तीन तासांपेक्षा अधिक वेळ चालणारा चित्रपट 'कभी अलविदा ना कहना' हा होता.
King Movie Duration 3/6

'कभी अलविदा ना कहना'

'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपट 2006 मध्ये आला होता. ज्याचा रन टाईम 3 तास 13 मिनिटं इतका होता. या चित्रपटाला दिग्दर्शक करण जोहरने दिग्दर्शित केले होते.
King Movie Duration 4/6

अनेक चित्रपटांमध्ये काम केलं ज्या तीन तासांपेक्षा जास्त वेळच्या होत्या

शाहरुख खानने आपल्या 34 वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं ज्या तीन तासांपेक्षा जास्त वेळच्या होत्या. या लिस्टमध्ये 'कभी खुशी कभी गम', 'मोहब्बतें' 'देवदास', 'स्वदेस', 'वीर जारा', 'कल हो ना हो' इत्यादी चित्रपट येतात.
King Movie Duration 5/6

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'जवान' (2023) हा 2 तास 49 मिनिटांचा होता, तर त्यांच्या कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'पठाण' (2023) हा 2 तास 26 मिनिटांचा होता.
King Movie Duration 6/6

'किंग' चित्रपटातील कलाकार

'किंग' चित्रपटामध्ये शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. दरम्यान अभिषेक बच्चन नकारात्मक भूमिकेत दिसणार असून या व्यतिरिक्त, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, राघव जुयाल, अभय वर्मा, अर्शद वारसी आणि जयदीप अहलावत यांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं ट्रेलर 14 डिसेंबर पर्यंत येणार असून 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
TAGS:
Shah Rukh Khan
Marathi News
Entertainment News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.