फक्त ₹500च्या आसपासच्या बजेटमध्येही काही छोट्या व्यवसायांना सुरुवात करता येऊ शकते. यातील काही व्यवसाय घरातून, तर काही मोबाइल आणि इंटरनेटच्या मदतीने सुरू करता येतात.
योग्य नियोजन, सातत्य आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण केल्यास छोट्या व्यवसायाचा हळूहळू विस्तार करता येऊ शकतो.
1/10
व्यवसाय सुरू करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा
सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यापेक्षा ऑर्डर मिळाल्यानंतर माल तयार करणे अधिक सुरक्षित ठरू शकते. व्हॉट्सएप बिझनेस, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करता येतो. सुरुवातीची कमाई पूर्णपणे खर्च करण्याऐवजी त्यातील काही रक्कम पुन्हा व्यवसायात गुंतवता येते.तसेच ग्राहकांशी चांगला व्यवहार, वेळेवर डिलिव्हरी आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खर्च, विक्री किंमत, नफा, स्थानिक मागणी आणि स्पर्धा यांचा अंदाज घ्यावा. ₹500मध्ये सुरुवात करता येते हा दावा असला तरी प्रत्यक्ष व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न व्यक्ती, उत्पादन आणि बाजारपेठेनुसार बदलू शकते.
2/10
कंटेट रायटिंग आणि स्क्रिप्ट रायटिंगमधून कमाई
लेखनाची आवड आणि चांगले भाषाज्ञान असणाऱ्यांसाठी कंटेट रायटिंग आणि स्क्रिप्ट रायटिंग हा घरबसल्या सुरू करता येणारा पर्याय आहे. ब्लॉग, युट्यूब चॅनेल, वेबसाइट आणि सोशल मीडिया पेजसाठी लेख, स्क्रिप्ट, कॅप्शन किंवा इतर मजकूर तयार करून फ्रिलान्स सेवा देता येते.या कामासाठी सुरुवातीची गुंतवणूक तुलनेने कमी असते. मोबाइल किंवा लॅपटॉप आणि इंटरनेटची सुविधा असल्यास काम सुरू करता येते. अनुभव आणि ग्राहकांची संख्या वाढल्यास कामाचे प्रमाणही वाढवता येते.
3/10
व्हॉट्सअॅप रिसेलिंगमधून स्टॉक न ठेवता विक्री
ज्यांच्याकडे स्वतःचा माल किंवा दुकान नाही, त्यांच्यासाठी व्हॉट्सअॅप रिसेलिंग हा पर्याय लेखात सुचवण्यात आला आहे. यामध्ये विविध उत्पादनांची माहिती किंवा फोटो ग्राहकांपर्यंत पोहोचवून ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करता येतो.काही रीसेलिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध उत्पादनांची माहिती ग्राहकांशी शेअर करता येते. ऑर्डर आणि प्लॅटफॉर्मच्या नियमांनुसार कमिशन किंवा मार्जिनमधून उत्पन्न मिळू शकते. मात्र कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करण्यापूर्वी त्याचे शुल्क, परतावा धोरण आणि कमिशनची रचना तपासणे आवश्यक आहे.
4/10
कॅन्वाच्या मदतीने डिजिटल इन्व्हिटेशन कार्ड
लग्न, वाढदिवस, नामकरण, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रमांसाठी आता डिजिटल निमंत्रणपत्रिकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे डिजिटल इन्विटेशन कार्ड तयार करून ऑनलाइन विक्री करता येऊ शकते. कॅन्वासारख्या डिझाइन टूलच्या मदतीने आकर्षक निमंत्रणपत्रिका तयार करून ग्राहकांच्या नाव, तारीख, वेळ आणि कार्यक्रमाच्या तपशीलानुसार कस्टमाईज करता येते. या व्यवसायासाठी दुकानाची आवश्यकता नसल्याने घरातूनच काम सुरू करता येऊ शकते.
5/10
पॉपकॉर्न बनवून विकण्याची कल्पना
पॉपकॉर्न तयार करून छोट्या पॅकेटमध्ये पॅक करणे आणि स्थानिक दुकानांमध्ये किंवा छोट्या स्टॉलमधून विकणे हा कमी गुंतवणुकीतील आणखी एक पर्याय म्हणून लेखात सांगण्यात आला आहे.सुरुवातीला छोट्या प्रमाणात उत्पादन करून परिसरातील बाजारपेठ तपासता येते. शाळा, बाजारपेठ, कार्यक्रम किंवा गर्दीच्या ठिकाणी विक्रीची संधी मिळू शकते. मात्र अन्नपदार्थ असल्याने स्वच्छता, पॅकेजिंग आणि लागू नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरते.
6/10
मठरी, पापड, नमकीनसारखे घरगुती पदार्थ विकता येतील
स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांसाठी घरगुती स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करता येतो. मठरी, पापड, नमकीन किंवा इतर घरगुती खाद्यपदार्थ तयार करून परिसरातील दुकाने किंवा थेट ग्राहकांना विकता येऊ शकतात.सुरुवातीला मोठ्या प्रमाणात माल तयार करण्याऐवजी ऑर्डर मिळाल्यानंतर उत्पादन करण्याचा पर्याय वापरल्यास न विकल्या गेलेल्या मालाचे नुकसान कमी करता येते. मात्र खाद्यपदार्थ विक्री सुरू करण्यापूर्वी लागू असलेले एफएसएसएआय आणि स्थानिक नियम तपासणे आवश्यक आहे.
7/10
हॅण्डमेड ब्रेस्लेट आणि ज्वेलरीचा पर्याय
हाताने तयार केलेले ब्रेसलेट, साधे दागिने आणि फॅशन अॅक्सेसरीज यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्राहक मिळू शकतात. त्यामुळे हॅण्डमेड ब्रेस्लेट आणि ज्वेलरी बनवून विकणे हा आणखी एक पर्याय आहे. सुरुवातीला मणी, धागे, हुक, चार्म्स आणि इतर आवश्यक साहित्य कमी प्रमाणात खरेदी करता येते. तयार वस्तूंचे फोटो व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करून ऑर्डर घेता येतात. ग्राहकांच्या पसंतीनुसार कस्टमर डिझाईन देणेही शक्य आहे.
8/10
कापसाच्या वात बनवून मंदिर आणि दुकानांमध्ये विक्री
अगदी कमी खर्चात सुरू करता येणाऱ्या पारंपरिक व्यवसायांमध्ये कापसाच्या वात बनवण्याचा व्यवसाय ही आहे. घरच्या घरी कापसापासून वात तयार करून त्या मंदिरांमध्ये, पूजासाहित्याच्या दुकानांमध्ये किंवा स्थानिक ग्राहकांना विकता येऊ शकतात. या व्यवसायात मोठ्या मशीनची आवश्यकता नसते. सुरुवातीला थोडा कच्चा माल घेऊन उत्पादन आणि बाजारातील मागणी तपासता येते. नियमित ग्राहक मिळाल्यास उत्पादनाचे प्रमाण वाढवता येते.
9/10
डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवून कमाई
आज अनेक छोटे व्यावसायिक, दुकानदार, फ्रीलान्सर आणि सेवा देणारे लोक डिजिटल पद्धतीने आपली माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवू इच्छितात. अशांसाठी डिजिटल विसिटिंग कार्ड तयार करून देणे हा कमी गुंतवणुकीतील पर्याय ठरू शकतो.मोबाइल किंवा संगणकावर उपलब्ध असलेल्या डिझाइन टूल्सच्या मदतीने नाव, फोन नंबर, व्यवसायाची माहिती, सोशल मीडिया लिंक आणि लोकेशन असलेले डिजिटल कार्ड तयार करता येते. हे कार्ड व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमातून ग्राहकांना देता येते. सुरुवातीला काही नमुने तयार करून स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांशी संपर्क साधता येतो.
10/10
फक्त ₹500 मध्ये सुरू करा हे 8 व्यवसाय! घरबसल्या कमाईची संधी; कोणता तुमच्या फायद्याचा?
कमी भांडवलामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार अनेक जण पुढे ढकलतात. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच लाखो रुपये लागतात, असे नाही. फक्त ₹500च्या आसपासच्या बजेटमध्येही काही छोट्या व्यवसायांना सुरुवात करता येऊ शकते. यातील काही व्यवसाय घरातून, तर काही मोबाइल आणि इंटरनेटच्या मदतीने सुरू करता येतात. योग्य नियोजन, सातत्य आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण केल्यास छोट्या व्यवसायाचा हळूहळू विस्तार करता येऊ शकतो.