जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते, तेव्हा त्याला 'सोमवती अमावस्या' म्हणतात. हा योग अत्यंत दुर्मिळ व पुण्यदायी मानला जातो
हिंदू धर्मात सोमवती अमावस्या आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा यांना अत्यंत मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे
1/7
फटाक्यांची आतिषबाजी अन् भंडाऱ्याची उधळण...; जेजुरी गडावर सोमवती अमावस्येचा उत्साह
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा पार पडत आहे.
2/7
कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान
सोमवती अमावस्या निमित्ताने जेजुरी गडावर पहाटे पाच वाजता श्री खंडोबा मंदिर गडकोटातून श्री खंडेरायाच्या पालखीचं कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले आहे.
3/7
भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण
खंडेरायाच्या पालखीचं प्रस्थान होताच यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी आणि भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली
4/7
कऱ्हा नदीपात्रात स्नान
दुपारी बारा वाजण्यापूर्वी उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीपात्रात स्नान घातलं जाईल. रात्री 10 वाजेपर्यंत पालखी सोहळा पुन्हा मंदिरात दाखल होईल.
5/7
श्री मार्तंड देव संस्थान
सोमवती अमावस्या निमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर दाखल झालेत श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी कडून भाविकांच्या दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात
6/7
जेजुरी गडावर गर्दी
या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी करतात.
7/7
महाराष्ट्राची प्राचीन लोकसंस्कृती
या उत्सवात महाराष्ट्राची प्राचीन लोकसंस्कृती, पालखीचे मानकरी, खांदेकरी, मानाचा अश्व आणि पारंपरिक वाद्यांचा संगम पाहायला मिळतो. भक्तांच्या उत्साहामुळे आणि भक्तीच्या महापुरामुळे या यात्रेला महाराष्ट्रभरातून व कर्नाटकातून लाखो भाविक उपस्थित.