Team India Players Comeback : न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघाची घोषणा झालेली आहे. भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचं जवळपास 4 वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन झालं. तो न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाजी अटॅकचा भाग आहे. मात्र भुवनेश्वर कुमारच नाही तर याआधी सुद्धा काही अनेक खेळाडूंचं अशा प्रकारे टीम इंडियात खूप मोठ्या काळानंतर पदार्पण झालं होतं.
Team India Players Comeback : न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघाची घोषणा झालेली आहे. भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचं जवळपास 4 वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन झालं. तो न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाजी अटॅकचा भाग आहे. मात्र भुवनेश्वर कुमारच नाही तर याआधी सुद्धा काही अनेक खेळाडूंचं अशा प्रकारे टीम इंडियात खूप मोठ्या काळानंतर पदार्पण झालं होतं.
1/7
भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार हा जवळपास 3 वर्ष 11 महिन्यांच्या मोठ्या काळानंतर आता भारतीय संघाकडून खेळताना दिसेल. संघामध्ये परतल्यामुळे, तो संजू सॅमसन आणि खलील अहमद यांच्या विशेष गटात सामील झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी दीर्घ कालावधीनंतर भारताच्या टी20 संघात पुनरागमन केले होते.
2/7
संजू सॅमसन
संजू सॅमसनने जुलै 2015 मध्ये भारताच्या संघाचा भाग होता. मात्र त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आलं आणि जवळपास ४ वर्ष 173 दिवसांनी तो संघात परतला. जानेवारी 2020 मध्ये त्याचं पुन्हा कमबॅक झालं.
3/7
खलील अहमद
खलील अहमदबाबत बोलायचं झाल्यास नोव्हेंबर 2019 मध्ये तो टी20 संघातून बाहेर झाला होता. मात्र जुलै 2024 मध्ये त्याच पुनरागमन झालं. संजू संघात आपले स्थान पक्के करण्यात यशस्वी झाला आणि आता नियमितपणे खेळत आहे, मात्र खलीलला त्यात यश आले नाही आणि तो पुन्हा संघाबाहेर फेकला गेला. आता संघात पुनरागमन करण्यासाठी, त्याला भुवनेश्वरप्रमाणेच सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल.
4/7
लाला अमरनाथ
लाला अमरनाथ हे सुद्धा भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे ज्यांना दीर्घकाळानंतर भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळालेली. दुसऱ्या महायुद्धामुळे, त्यांना पुनरागमन करण्यापूर्वी 12 वर्षे आणि 129 दिवस खेळापासून दूर राहावे लागले होते.
5/7
जयदेव उनाडकट
जयदेव उनाडकट हा सुद्धा या खेळाडूंच्या यादीत येतो. डिसेंबर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सामना खेळल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सीरिजसाठी तो भारताच्या टेस्ट संघात परतला हा 12 वर्षे आणि 2 दिवसांचा कालावधी होता.
6/7
पार्थिव पटेल
भारताचा स्टार क्रिकेटर पार्थिव पटेल याचं सुद्धा टीम इंडियातील कमबॅक हे खास होतं. ऑगस्ट 2008 मध्ये शेवटचा सामना खेळल्यानंतर पार्थिव पटेल नोव्हेंबर 2016 मध्ये पुन्हा मैदानात परतला. त्याच्या या दोन सामन्यांमध्ये 8 वर्षे आणि 107 दिवसांचे अंतर होते.
7/7
करुण नायर
टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणाऱ्या खेळाडूंमध्ये करुण नायर यांचा सुद्धा समावेश आहे. भारतासाठी त्रिशतक झळकावून चर्चेत आलेल्या करुणने 8 वर्षे आणि 83 दिवसांनंतर पुनरागमन केले. मार्च 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळल्यानंतर तो 2025 मध्ये कसोटी संघात परतला.