सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असले तरी यंदाच्या धनत्रयोदशीला देशभरात सोन्याची आणि चांदीची किती विक्री झाली याची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. नेमकं किती सोनं-चांदी विकली गेली धनत्रयोदशीला जाणून घ्या...
सोन्या, चांदीच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. दिवाळीमध्ये खास करुन धनत्रयोदशीला नेमकी किती सोनं, चांदी खरेदी झाली पाहूयात...
1/8
सोनं-चांदी खरेदीत मोठी वाढ
शुक्रवारी, धनत्रयोदशीच्या दिवशी देशात हजारो कोटी रुपयांची सोनं-चांदी खरेदी झाली. नेमकी किती आणि कुठे मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीची खरेदी झाली पाहूयात...
2/8
ग्राहकांनी जोरदार खरेदी केली
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली असतानाही धनत्रयोदशीला देशभरातील सराफा बाजारात ग्राहकांनी जोरदार खरेदी केली.
3/8
एकत्रित व्यवसाय 66 हजार कोटी रुपयांच्या पुढे
'ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन'च्या अहवालानुसार, यंदा धनत्रयोदशीला सोने-चांदीचा एकत्रित व्यवसाय 66 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला.
4/8
सोन्याच्या विक्रीत 15 ते 20% वाढ
'कॅट'च्या अंदाजानुसार, ही उलाढाल 60 हजार कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत 15 ते 20% वाढ झाल्याचा अंदाज आहे.
5/8
ग्राहकांनी चांदीकडे मोर्चा वळवला
चांदीच्या विक्रीत वाढ सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अनेक ग्राहकांनी चांदीकडे मोर्चा वळवला.
6/8
चांदीच्या विक्रीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ
दागिने, नाणी आणि अन्य वस्तूंच्या खरेदीत वाढ झाली. सोनं महाग झाल्याने तसेच मागणी अधिक असल्याने यंदा चांदीच्या विक्रीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचा अंदाज आहे.
7/8
महाराष्ट्रात मोठी उलाढाल
महाराष्ट्रातील सराफा बाजारातही मोठी आर्थिक उलाढाल झाली. मुंबई वगळता राज्यात सुमारे 5 हजार कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे.
8/8
एकट्या मुंबईतील उलाढाल किती?
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात सराफा बाजारातील उलाढाल 6 हजार 500 कोटी ते 9 हजार 500 कोटी रुपये झाली. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य-वृत्तसंस्थांकडून साभार)