• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीची संपत्ती किती? IPL च्या मैदानात दिसणार नाही, मग कशी करणार कमाई?

क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीची संपत्ती किती? IPL च्या मैदानात दिसणार नाही, मग कशी करणार कमाई?

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 17, 2026, 17:19 IST|Updated: Nov 17, 2026, 17:24 IST
joinshare
MS Dhoni Net Worth : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता क्रिकेटचा मैदानात दिसणार नाही. कारण त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

MS Dhoni Net Worth : एमएस धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो आयपीएलच्या मैदानात दिसत होता. पण आता धोनी क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांना खेळताना दिसणार नाही.
 

MS Dhoni Net Worth 1/8

धोनीची संपत्ती किती?

आता प्रश्न असा पडला आहे की, नेतृत्तीची घोषणा केलेल्या धोनीकडे संपत्ती किती आहे. शिवाय आता तो कशातून पैसे कमावणार आहे.
MS Dhoni Net Worth2/8

धोनीची संपत्ती किती?

मिडिया रिपोर्टनुसार धोनीने आतापर्यंत ₹1,000 कोटींहून अधिक संपत्ती जमवली आहे. धोनीने ही संपत्ती फक्त क्रिकेटचे मैदानातून नाही तर व्यावसायिक जगातही स्वत:ला सिद्ध करुन कमावली आहे.
MS Dhoni Net Worth3/8

धोनीची संपत्ती किती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही आयपीएलमधील मानधन, जाहिरातींमधील कमाई, स्टार्टअपमधील गुंतवणूक आणि विविध व्यावसायिक उपक्रमातून धोनीने पैसे कमावले आहेत.
MS Dhoni Net Worth4/8

धोनीची संपत्ती किती?

धोनीची आतापर्यंतची एकूण आयपीएल कमाई अंदाजे 190 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा त्याचा उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत होता.
MS Dhoni Net Worth5/8

धोनीची संपत्ती किती?

त्यानंतर येतं ब्रँड एंडोर्समेंट, हो तो अनेक कंपन्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट आहे. ऑगस्ट 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या क्रोलच्या 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2025' नुसार, धोनीच्या सेलिब्रिटी ब्रँडचे मूल्य 115.3 दशलक्ष डॉलर्स होतं असा अंदाज त्यात व्यक्त करण्यात आला होता. या आकड्यानुसार तो भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ब्रँड्सपैकी एक ठरलाय.
MS Dhoni Net Worth6/8

धोनीची संपत्ती किती?

क्रिकेटला रामराम केल्यानंतरही, एंडोर्समेंट्स आणि ब्रँड पार्टनरशिप्सच्या बाबतीत धोनीची व्यावसायिक ताकद कायम पाहिला मिळणार आहे. तर धोनीने विविध स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख व्यवसायांमध्येही गुंतवणूक केलीय. इकॉनॉमिक टाइम्सच्या ट्रॅक्शन डेटावर आधारीत अहवालानुसार, धोनीने पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, फिनटेक, ड्रोन तंत्रज्ञान, पर्यायी प्रथिने आणि क्रीडा तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील कंपन्यांचा गुंतवणूक केली आहे.
MS Dhoni Net Worth7/8

धोनीची संपत्ती किती?

धोनीने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांमध्ये BluSmart, Khatabook, CARS24, Garuda Aerospace, Centricity, Rigi, EMotorad, Shaka Harry, 7Ink Brews, Tagda Raho आणि Run Adam आहेत.
MS Dhoni Net Worth8/8

धोनीची संपत्ती किती?

तर धोनीच्या सर्वात उल्लेखनीय स्टार्टअप गुंतवणुकींबद्दल बोलायचं झालं तर चेन्नईमधील ड्रोन तंत्रज्ञान कंपनी, गरुडा एरोस्पेस. इकॉनॉमिक टाइम्सच्या ऑक्टोबर 2024 च्या अहवालात सांगण्यात आलं होतं की, धोनीने या कंपनीत अतिरिक्त 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जिचा हिस्सा 1.1 टक्क्यांपर्यंत वाढवलाय. त्यानंतर गरुडा एरोस्पेसने 'सीरीज बी' फंडिंगमध्ये धोनीने 100 कोटी रुपये उभारलंय.
TAGS:
MS Dhoni
IPL
Cricket News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.