SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 8 नोव्हेंबर 2026 : लक्ष्मीपूजनाला आयुष्मान योग, या लोकांवर बसरणार लक्ष्मीची कृपा, कोणाला राहायचं आहे सावध?

Aajche Rashi Bhavishya 8 November 2026 : आज दिवाळी..., लक्ष्मीपूजनचा आजचा दिवस दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 08, 2026, 07:32 IST | Updated: Nov 08, 2026, 07:35 IST
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 8 November
Join

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 8 November 2026 in Marathi : आली आली दिवाळी आली...आज घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. पंचांगानुसार आयुष्मान योग, बुधादित्य योग, वाशि योग, आनन्दादि योग, सुनफा योग आहे. आज कोणावर लक्ष्मीची कृपा होणार तर कोणाला सावधगिरी बाळगायची आहे जाणून घ्या  मेष ते मीनचे आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

दिवाळीच्या आजचा दिवस तुमचा चांगला जाणार आहे. तुम्ही जोडीदारासोबत सलोखा टिकून ठेवाल. मुलं आज त्यांची मनातील गोष्ट सांगणार आहेत.  


वृषभ (Taurus Zodiac)

दिवाळीच्या आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. कामात कौतुक तर समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. नातेवाईकांचे येणे घरातील आनंद द्विगुणीत करणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)

दिवाळीच्या आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. जुना मित्राचा फोन किंवा भेट तुम्हाला सुखद आनंद देणार आहे.  कुटुंबाचा पाठिंबा मिळणार आहे.

कर्क (Cancer Zodiac)  

आज दिवाळीच्या दिवशी तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे. तुमच्या प्रेमाबद्दल घरी सांगणार आहात.

सिंह (Leo Zodiac)

आज दिवाळीचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. तुमच्या कानावर चांगली बातमी पडणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे.


कन्या (Virgo Zodiac)  

आज दिवाळीचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. कोणाशीही वाद घालू नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.

हेसुद्धा वाचा - Happy Diwali 2026 Wishes : लक्ष दीप हे उजळले घरी...कुटुंबातील सदस्य, प्रियजणांसह मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊ साजरी करा प्रकाशमय दिवाळी

तूळ (Libra Zodiac)  

दिवाळीचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. व्यवसायिकांना अधिक मेहनत करावी लागणार आहे. आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा करु नका.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आज दिवाळीच्या दिवशी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमचा जोडीदार खूश होणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

दिवाळीच्या आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तुम्ही अत्यंत कठीण कामं वेळेवर पूर्ण करणार आहात. प्रियजनांच्या मदतीने महत्त्वाच्या कामात यश मिळणार आहे.

हेसुद्धा वाचा - नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय?

मकर (Capricorn Zodiac)  

दिवाळीचा दिवस तुमच्यासाठी यश घेऊन आला आहे. व्यवसायिकांना मात्र आज कठोर परीश्रम करावे लागणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आज दिवाळीचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

दिवाळीचा दिवस चांगला जाणार असून तुम्ही कोणाला तरी आर्थिक मदत करणार आहात. तुमच्या कामाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. कामात मोठं यश मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES