Baba Vanga Horoscope Prediction 15 to 31 October 2026 in Marathi : ऑक्टोबर महिन्यातील शेवटचे 15 दिवस हे पाच राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. दसरा, पाशंकुशा एकादशी, कौजागरी पौर्णिमा आणि संकष्ट चतुर्थीचा हे दिवस असणार आहे. प्रसिद्ध भविष्यवर्ता बाबा वेंगा यांनी या 15 दिवसाबद्दल भाकीत केलं आहे. हे ऑक्टोबरचे उरलेले दिवस पाच राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबींपासून वैयक्तिक संबंधांपर्यंत अतिशय सकारात्मक असणार आहे. कोणत्या आहेत त्या पाच राशी जाणून घेऊयात.
या लोकांसाठी नवीन कल्पना आणि संधी घेऊन हे 15 दिवस आले आहेत. या लोकांना आपली नोकरी, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम करणारा असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्य आनंदाची बातमी देणार आहे. कुटुंबात आनंद असणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यामुळे आर्थिक स्थिरता येणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळणार आहे.
तुमच्या जुन्या चिंता दूर होणार आहे. व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही पुढे वाटचाल करणार आहात. कठीण परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडणार आहात. तुम्हाला हे दिवस दिलासा देणारा असणार आहे. आर्थिक स्थितीत स्थिरता येणार आहे. भविष्यातील योग्य नियोजन तुम्हाला आनंद देणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दिवस सकारात्मक असणार आहे. शिवाय कौटुंबिक आधारातून तुम्हाला मानसिक तणावातून सुटका होणार आहे.
हे दिवस या राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास वाढविणारा असणार आहे. या दिवसांमध्ये नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमची अनेक नियोजित कामं मार्गी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ तुम्हाला मिळणार आहे. बँक बॅलेन्स वाढीसाठी तुम्हाला नवीन पर्याय सापडणार आहे. भविष्यातील योजनासाठी हा काळ सकारात्मक असेल. वैवाहिक जीवनातही जोडीदारासोबतचे नातनं चांगलं राहणार आहे. तुम्ही मालमत्ता खरेदीचा विचार करणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी हे दिवस अतिशय उत्साही ठरणार आहे. पुढील 15 दिवस तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. रखडलेल्या कामात प्रगती होणार आहे. करिअरच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. या काळात सुरू असलेल्या कौटुंबिक समस्यांचे निराकरण होणार आहेत. तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजनही करणार आहात. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, ते परत मिळणार आहे.
पुढील 15 दिवस या लोकांसाठी आर्थिक बाबींसाठी सकारात्मक ठरणार आहे. या काळात, तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग सापडणार आहे. नोकरदार व्यक्तींना आपले काम सुधारण्याची आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळणार आहे. व्यावसायिकांनी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांतून नफ्याची अपेक्षा असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)