SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिवाळीपूर्वी या 3 राशींच्या लोकांसाठी संकटाचे! गुरू गोचरमुळे 31 ऑक्टोबरपासून अडचणीत वाढ

येत्या 31 ऑक्टोबर 2026 ला गुरू ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. याचा परिणाम तीन राशींच्या लोकांसाठी अडचणींचा असणार आहे. या लोकांना करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 07:27 AM IST | Updated: Oct 29, 2026, 07:52 AM IST
Image Credit: guru gochar
Join

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांपैकी गुरू ग्रह सिंह राशीत लवकरच प्रवेश करणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2026 ला गुरू सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरू गोचरमुळे 12 राशींवर कमी - जास्त परिणाम पाहिला मिळणार आहे. पण तीन राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचे गोचर घातक ठरण्याचा दावा ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केला आहे. गुरू हा ज्ञान, भाग्य, संतती आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जातो. तर सिंह राशीचा कारक सूर्य असून आत्मविश्वास, सन्मान आणि प्रतिष्ठेशी जोडला आहे. त्यामुळे गुरू गोचरमुळे या तीन राशीच्या लोकांच्या सर्व गोष्टींवर होणार आहे. कोणत्या आहेत या तीन राशी जाणून घ्या. 

मीन रास

या राशीच्या लोकांना खास करून या काळात सावध राहायचं आहे. तुमची काही कामं अपेक्षेप्रमाणे होणार नाही. एकाच वेळी अनेक कामं अंगावर घेतल्यामुळे गोंधळ होणार आहे. जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्याशी वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अचडणींचा सामना करावा लागेल. काम करताना सावध राहा. बिझनेस करणाऱ्यांनी लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा. 

तूळ रास

या लोकांना गुरू गोचरमुळे आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे लागणार आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पातील फायदे आणि तोटे जाणूनच व्यवहार करणे हिताचे ठरणार आहे. बिझनेस करणाऱ्यांनी लोकांनी आर्थिक व्यवहारात सतर्क राहणे गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्यांवर कामाच्या तणाव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.  पैसा, नातेसंबंध आणि करिअर याबद्दल निर्णय घेताना सावध राहा. 

हेसुद्धा वाचा - येत्या 31 ऑक्टोबरपासून धनु आणि कुंभ राशीसह 3 राशींची चांदीच चांदी, गुरू ग्रहाचे सिंह राशीत प्रवेश ठरणार लाभदायक


वृषभ रास

या लोकांनी कोणतही काम हातात घेताना त्यात लक्ष द्यावे अन्यथा संकटात सापडू शकता. कामात दिरंगाई करु नका. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवन किंवा प्रेम जीवनात लहानसहान गोष्टींवरून जोडीदारासोबत वादाचे संकेत आहे. त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या. या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांनाही अधिक मेहनत करावी लागणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES