वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलं की, केतूचा माघ नक्षत्रात डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. या दरम्यान नक्षत्राची विविध स्थिती बदलत राहणार आहे. त्यामुळे याचा परिणाम विशेष राशीच्या लोकांवर होणार आहे. ३ ऑक्टोबर २०२६ पासून केतू मघा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात आहे. या काळात केतू सिंह राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, या बदलाचा परिणाम व्यक्तीच्या संपत्ती, कुटुंब, नातेसंबंध, निर्णयक्षमता आणि मानसिक स्थितीवर पाहिला मिळणार आहे. कोणत्या सहा राशीच्या लोकांवर संकटांचा डोंगर कोसळणार आहे, जाणून घ्या.
वृषभ रास
या लोकांच्या घर, कुटुंब, आई, संपत्ती आणि मानसिक आरोग्यावर केतूच्या स्थिती बदलाचा परिणाम होणार आहे. तुमचे मन कौटुंबिक बाबींमुळे चिंतेत राहणार आहे. कुटुंबासोबतही तुम्हाला भावनिक दुरावा जाणवणार आहे. मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित जुने प्रश्न पुन्हा उफाळून येणार आहे. घर बदलण्याबाबत किंवा मालमत्तेसंबंधी कोणतेही मोठे निर्णय घेताना काळजी घ्या.
कर्क रास
या लोकांच्या संपत्ती, बचत, कुटुंब आणि वाणी यावर नकारात्मक परिणाम दिसणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये खर्च अचानक वाढणार आहे. बचतीवर परिणाम पाहिला मिळणार आहे. आर्थिक बाबींमधील निष्काळजीपणामुळे नुकसानदायक ठरणार आहे. त्याच वेळी, राग किंवा घाईघाईत बोलल्यामुळे कुटुंबात तणाव जाणवणार आहे. बोलताना शब्दांची काळजी या काळात घ्या.
सिंह रास
या लोकांना आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्वा आणि भविष्यातील वाटचालीविषयी संभ्रम वाटणार आहे. एखाद्या कामात आवड निर्माण झाल्यावर, तुम्हाला अचानक ते काम सोडून द्यावेसे वाटणार आहे. नात्यांमध्ये अनावश्यक अंतर निर्माण होणार आहे.
कन्या रास
तुम्हाला या काळात अनियोजित खर्च वाढणार आहे. जिथे तुम्हाला तात्काळ फायदा दिसणार नाही, तिथे पैसे गुंतवणे करणे महागात पडणार आहे. झोप आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा दूरच्या ठिकाणांसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा अन्यथा महागात पडू शकतं.
मकर रास
या लोकांच्या आकस्मिक बदल, वारसा हक्क, संयुक्त संपत्ती, गुप्त बाबी आणि जोखीम यावर परिणाम होणार आहे. या काळात कोणताही आर्थिक निर्णय घेणे टाळा अन्यथा नुकसानदायक ठरेल. विमा, कर, वारसा, संयुक्त मालमत्ता किंवा सामायिक आर्थिक बाबींशी संबंधित कागदपत्रांचे सखोल पुनरावलोकन होणार आहे. वाहन चालवताना घाई टाळा.
कुंभ रास
या लोकांच्या विवाह, जोडीदार, व्यावसायिक भागीदारी आणि जनसंपर्क यावर परिणाम होणार आहे. या काळात, तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये भावनिक दुरावा किंवा संवादाचा अभाव जाणवणार आहे. तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबतही मतभेद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नवीन जोडीदारावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी, आवश्यक माहितीची पडताळणी करा अन्यथा संकटात सापडाल. नातेसंबंधातील वैयक्तिक बाबी कोणाशीही शेअर करु नका.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)