बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात मोठा आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान या हल्लेखोरांनी धक्कादायक माहिती दिली आहे. तपासात असंही समोर आलं आहे की, टायगर श्रॉफवर हल्ल्या करण्यापूर्वी आमिर खान हा हल्लेखोऱ्यांच्या टार्गेट होतं. या हल्लेखोऱ्यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरांची रेकी केली होती. महत्त्वाचे म्हणजे बॉलिवूडमधील सिरियल किसर इम्रान हाश्मीचं घर हल्लेखोरांना सापडलं नाही, म्हणून तो त्यांच्या टार्गेटमधून वाचला. पण टायगर श्रॉफला लक्ष्य करणे हल्लेखोऱ्यांना सोपे झालं होतं, कारण तो सोशल मीडियावर त्याची माहिती मिळत होती.
मुख्य शूटर फूल सिंह आणि रेहान यांनी चौकशीदरम्यान असा दावा केला की, त्यांना टायगर श्रॉफची हत्या करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तर त्यांना बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करायची होती. मुंबई गुन्हे शाखेमधील सूत्रांनी सांगितलं की, हल्लेखोर चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक दावे करत आहेत.
हल्लेखोऱ्यांनी चौकशीदरम्यान असाही दावा केली की, जुहूमधील पुष्पा नरसी पार्क टायगर श्रॉफ फुटबॉलचा सामना खेळत होता. त्यावेळी शूटर त्याच्या अगदी जवळ होता आणि शिवाय टायगर श्रॉफसोबत त्यावेळी सुरक्षा रक्षक किंवा बाउन्सर नव्हता. त्यामुळे त्यावेळी टायगर श्रॉफला मारणे सोपे होते.
पुढे आरोपींना असाही दावा केला की, टायगर श्रॉफची हत्याच करायची असती तर त्याला फुटबॉल खेळत असतानाच मारे अगदी सोपे होते. पण त्यांना टायगर श्रॉफची हत्या करायची नव्हती. तर त्यांना बॉलिवूडमध्ये दहशत पसरावयची होती. बॉलिवूडमधील कलाकारांना भीती दाखवण्यासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडून शूटर फूल सिंह आणि रेहान यांची सतत सखोल चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यामुळे या तपासाला दिशा मिळत असून त्यांच्या दाव्यात किती दम आहे, हे तपासले जात आहे. या हल्ल्यामागील मास्टरमाइंड कोण आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.