• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /Weekly Tarot Horoscope : दसऱ्याचा हा आठवडा कर्क आणि तूळ राशीसाठी विशेष, 12 राशीच्या लोकांसाठी कसा आहे हा आठवडा?

Weekly Tarot Horoscope : दसऱ्याचा हा आठवडा कर्क आणि तूळ राशीसाठी विशेष, 12 राशीच्या लोकांसाठी कसा आहे हा आठवडा?

Weekly Tarot Horoscope Prediction 19 to 25 October 2026 in Marathi : दसरा ते कोजागरी पौर्णिमेचा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 17, 2026, 04:26 PM IST|Updated: Oct 17, 2026, 06:44 PM IST
joinshare
Weekly Tarot Horoscope : दसऱ्याचा हा आठवडा कर्क आणि तूळ राशीसाठी विशेष, 12 राशीच्या लोकांसाठी कसा आहे हा आठवडा?
Image Credit: Tarot

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Weekly Tarot Horoscope Prediction 19 to 25 October 2026 in Marathi : अष्टमी, नवमी नवरात्रीसह दसरा ते कोजागरी पौर्णिमा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.  करिअर, प्रेम जीवन, आर्थिक बाबी आणि वैयक्तिक निर्णयांसाठी सकारात्मक असणार आहे. असा हा 19 ते 25 ऑक्टोबरचा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझाकडून


मेष (Aries Zodiac)

या आठवड्यात तुमच्यावर नवीन जबाबदारी खांद्यावर पडणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांचे चांगली साथ मिळणार आहे. एखाद्या गोष्टीबद्दल असलेला संभ्रम या आठवड्यात दूर होणार आहे. हा आठवडा नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम असणार आहे. इतरांना आर्थिक मदत करताना स्वत:च्या गरजांवर लक्ष द्या. नात्यांमध्ये सहकार्य सकारात्मक ठरणार आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीसोबतचे गैरसमज संवादातून दूर होणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

ही लोक कामाबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल असमाधानी असणार आहे. एखादी चांगली संधी देखील स्विकारण्यास तुम्ही हतबल असणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमच्या गरजा आणि अपेक्षांवर पुन्हा विचार करा. कुठलाही निर्णय हा घाईघाईने घेऊ नका. या आठवड्यात तुमच्या बजेट आणि जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय साधा. नात्यामध्ये भावनांना महत्त्व द्या. या आठवड्यात जुन्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची संधी मिळणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)

या लोकांना नातेसंबंध, भागीदारी किंवा महत्त्वाच्या निर्णयांबद्दल संभ्रम वाटणार आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती कठीण असणार आहे. झटपट निकालाच्या विचार करण्यापेक्षा योजनेवर लक्ष केंद्रीत करुन काम करा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कुटुंबाच्या किंवा प्रियजनांच्या अपेक्षांमुळे तुमच्यावर दबाव पडणार आहे. सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. प्रेम जीवनात मतभेद टाळा.

कर्क (Cancer Zodiac)

हा आठवडा तुम्हाला भावनिक दिलासा देणारा असणार आहे. नवीन विचार करण्यासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी जुनी सवय किंवा जुनी पद्धत बदलावी लागणार आहे. नातेसंबंधांमध्ये जवळीक वाढणार आहे. अस्वास्थ्यकर सवयींपासून दूर रहा. दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा आठवडा चांगला आहे.


सिंह (Leo Zodiac)

कामाच्या ठिकाणी योजना किंवा कामात संथ गती असणार आहे. या आठवड्यात अपेक्षित परिणाम मिळणार नाही. तुमची रणनीती ठरवण्याचा हा आठवडा असणार आहे. कामाच्या ठिकाणी कल्पना आणि जबाबदाऱ्यांसाठी ठामपणे उभे राहणे हिताचे ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. नात्यांमध्ये मतं ठामपणे मांडा. काही जुने वाद संवादातून दूर होणार आहे. आर्थिक बाबीमध्ये सावध राहा.


कन्या (Virgo Zodiac)

काम आणि जबाबदाऱ्यांमुळे मानसिक थकवा जाणवणार आहे. प्रत्येक समस्या एकट्याने सोडवण्यापेक्षा इतरांची मदत घ्या. योजनांमधून हवं तशी प्रगती दिसत नसल्यास त्याचा पुनर्विचार करा. या आठवड्यात आरामावर भर द्या. नात्यांमध्ये भावनिक संतुलन येणार आहे. प्रिय व्यक्तीच्या समस्या ऐकताना संयम ठेवणे हिताचे ठरणार आहे. आर्थिक व्यवहारात तणावाखाली निर्णय घेऊ नका.


तूळ (Libra Zodiac)

या आठवड्यात नातेसंबंधात सुधारणा होणार आहे. शिवाय भूतकाळातील तणाव दूर करण्यासाठी हा आठवडा उत्तम असेल. नात्यामध्ये मोकळा संवाद नातं मजबूत करणार आहे. एखाद्या व्यक्तीपासून दुरावा दूर करण्यासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम पाहिला मिळेल. आर्थिक किंवा कौटुंबिक दबाव कमी होणार आहे. भूतकाळातील चूक सुधारून नव्याने प्रवास सुरु करा.


वृश्चिक (Scorpio Zodiac)

या आठवड्यात एखाद्या जुन्या परिस्थितीवर किंवा अपूर्ण कामावर तुम्ही विचार करणार आहात. बदल करणे गरजे आहे हे माहिती असून ते प्रत्यक्षात करणे तुम्हाला कठीण जाणार आहे. कामाच्या ठिकामी जबाबदाऱ्या वाढणार आहे. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, स्पष्ट संवाद आणि मर्यादा राखणे उत्तम ठरणार आहे. नात्यातील वारंवार तणावाचे मूळ जाणून त्यावर उपाय शोधा. भावनांपेक्षा तथ्यांवर विश्वास ठेवा. 

धनु (Sagittarius Zodiac)
या लोकांना या आठवड्यात वारंवार परिस्थिती बदलाचा सामना करावा लागणार आहे.  कामांमध्ये अतिरिक्त प्रयत्नांची गरज भासणार आहे. निराश होऊन मार्ग बदलू नका. तर आपल्या कौशल्यावर काम करा. नवीन अनुभव किंवा संवाद नात्यामध्ये उत्साह आणणार आहे. परिस्थिती समजून भविष्यातील गोष्टीबद्दल आश्वासन द्या. अचानक येणाऱ्या फायद्यामुळे अधिक खर्च करु नका.


मकर (Capricorn Zodiac)

या आठवड्यात तुम्हाला निराश वाटणार आहे. तुम्हाला हवं तसं यश किंवा अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज असणार आहात. कामात अडथळा येणार असून त्यामागील कारण शोधा. कोणत्याही आश्वासनावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या तयारीवर विश्वास ठेवा. खर्च, बचत आणि वैयक्तिक गरजा यात संतुलन राखा. कोणत्याही आकर्षक ऑफर्स किंवा झटपट नफ्यांकडे आकर्षित होऊ नका. नात्यांमधील निराशांमुळे आपल्या गरजांकडे नजरअंदाज करु नका. 


कुंभ (Aquarius Zodiac)

अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी न विचार करता त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. एखाद्या सहकाऱ्याशी वाद झाल्यावर तुमचे विचार व्यवस्थित मांडा. टीम सोबत काम करणे योग्य निर्णय ठरणार आहे. मित्र किंवा कुटुंबासोबत वेळ व्यतित केल्यामुळे मनःशांती प्राप्त होणार आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून आर्थिक नियोजन करा. कामात तडजोड करु नका. 


मीन (Pisces Zodiac)

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या क्षमतांबद्दल शंका वाटणार आहे. जर एखादे आव्हान किंवा दीर्घकाळ चालणारी समस्या तुमचा आत्मविश्वास कमी करणार आहे. तर स्वतःवर जास्त ताण देऊ नका. कामाच्या ठिकाणी, भविष्यासाठी नियोजनावर लक्ष द्या. जर तुम्ही एखाद्या मोठ्या बदलाचा विचार करताना आव्हान आणि नफा - तोटा समजून घ्या. नात्यांमध्ये एखादा जुना मुद्दा किंवा न सुटलेला वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यावर तोडगा काढा. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी नियोजन करणे हिताचे ठरणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Zodiac Signs
Horoscope
Astrology