• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /कुंभ मेळा आणि सिंहस्थ कुंभमेळा यातील फरक काय? नाशिकमध्ये 12 वर्षांनीच का भरतो कुंभमेळा?

कुंभ मेळा आणि सिंहस्थ कुंभमेळा यातील फरक काय? नाशिकमध्ये 12 वर्षांनीच का भरतो कुंभमेळा?

सिंहस्थ कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरत असणारा एक अत्यंत पवित्र आणि मोठा हिंदू धार्मिक सोहळा आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 02, 2026, 02:03 PM IST|Updated: Oct 02, 2026, 02:06 PM IST
joinshare
कुंभ मेळा आणि सिंहस्थ कुंभमेळा यातील फरक काय? नाशिकमध्ये 12 वर्षांनीच का भरतो कुंभमेळा?
Image Credit: kumbh mela 2027

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिकमध्ये 12 वर्षांनंतर कुंभमेळा होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळा 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. पण दर 12 वर्षांनीच नाशिकमध्ये कुंभमेळा का भरतो? सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे का? जाणून घेऊयात.

नाशिकमध्ये 2026 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पहिले अमृतस्नान - 2 ऑगस्ट 2027, द्वितीय अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027, तृतीय अमृतस्नान - 11 सप्टेंबर 2027   रोजी पार पडणार आहे. कुंभमेळ्यात साधू-संत, विविध आखाड्यांचे प्रमुख आणि कोटी कोटी भाविक या सोहळ्यात भक्तिभावाने सहभागी होतात.

ग्रह आणि नक्षत्रांच्या (विशेषतः गुरु, सूर्य आणि चंद्र) विशिष्ट ज्योतिषीय स्थितीनुसार दर 12 वर्षांनी प्रत्येक स्थळी पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो. हा मेळा चार वेगवेगळ्या शहरांत फिरून भरतो. प्रयागराज (गंगा, यमुना, सरस्वती संगम), हरिद्वार (गंगा नदी), उज्जैन (शिप्रा नदी) आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर (गोदावरी नदी) येथे फिरतो.

सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे काय?

जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. गुरु (बृहस्पति) ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा कुंभमेळा आयोजित केला जातो. 'सिंह' राशीत गुरुचे स्थान असल्यामुळे याला सिंहस्थ असे म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठावर भरतो. याशिवाय मध्य प्रदेशातील उज्जैन येथेही शिप्रा नदीच्या काठी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

धार्मिक महत्त्व काय?

पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनानंतर अमृत कलशातून थेंब पडलेल्या चार ठिकाणांपैकी नाशिक-त्र्यंबकेश्वर हे एक आहे. या पवित्र काळात नदीत स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Astrology
Nashik
Religion News