SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

17 वर्षीय महिला क्रिकेटरने स्वतःला संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल, क्रिकेट विश्व हळहळलं

Cricket News : काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अंडर 19 संघात सिलेक्शन झालेल्या तेलंगणाच्या 17 वर्षीय महिला क्रिकेटरने गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून समोर आलेलं कारण ऐकून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 14, 2026, 08:01 AM IST | Updated: Nov 14, 2026, 08:32 AM IST
Image Credit: 17 वर्षीय महिला क्रिकेटरने स्वतःला संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल, क्रिकेट विश्व हळहळलं
Join

Cricket News : तेलंगणा येथून क्रिकेट विश्वाला हादरा देणगी एक दुःखद घटना समोर आलेली आहे. तेलंगणाच्या 17 वर्षीय महिला क्रिकेटरने पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे, सदर घटना ही तेलंगणा येथील विकाराबाद मधू कॉलोनी येथील असून काही दिवसांपूर्वीच नंदिनीचं सिलेक्शन हे बीसीसीआयच्या अंडर 19 संघात झालेलं होतं. त्यानंतर अचानकपणे नंदिनीने हे टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटुंब हे धक्क्यात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी ही विकाराबाद जिल्ह्यातील सांगयापल्ली गावात राहत होती. विकाराबाद येथे आपल्या आजीच्या घरी राहून नंदिनी शिक्षण पूर्ण करण्यासोबतच क्रिकेट कोचिंग सुद्धा घेत होती. अंडर-19 संघात सिलेक्शन झाल्यावर नंदिनीमुळे विकाराबाद आणि तिच्या गावाला ओळख मिळाली होती. तसेच आगामी काळात ती अजून पुढे जाईल अशी देखील आशा बाळगली जात होती.

नेमकं कारण काय?

नंदिनीच्या कुटुंबाने आरोप लावला आहे की अनिल आणि कृष्णा नावाचे दोन पुरुष हे नंदिनीला सारखे त्रास द्यायचे. याच कारणामुळे नंदिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे. इंडिया टुडेच्या नुसार अनिल मागच्या काही दिवसांपासून नंदिनीचा पाठलाग करायचा. तर कृष्णा त्याला या सगळ्यात साथ देत होता.

पोलिसांना सकाळी 9 वाजता नंदिनीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. विकाराबाद सर्कल इन्स्पेक्टर रघु यांनी सांगितले की, आज सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तपासातून असे समोर आले आहे की, नंदिनीने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दोन व्यक्तींवर छळाचा आरोप केल्याचेही इन्स्पेक्टरनी स्पष्ट केले. पुढील तपासासाठी पोलिसांनी नंदिनीचा मोबाईल फोन जप्त केला असून तो फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला आहे.

हेही वाचा : चौथ्या सामन्यात भारताच्या 6 विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूला सामन्यानंतर विराट कोहलीने दिलं गिफ्ट, Video केला शेअर

पोलिसांनी तक्रार केली दाखल :

नंदिनीच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली असून त्यांनी रस्त्यावर याबाबत निदर्शन सुद्धा केली. त्यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नंदिनीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES