SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IPL 2027 पूर्वी CSK मध्ये मोठे बदल, मायकल हसी सह 5 कोचने सोडला संघ

IPL 2027 Coaching Staff Change : आयपीएल 2026 सीजननंतर सीएसकेचा हेड कोच असलेला स्टीफन फ्लेमिंग हा आपल्या पदावरून बाजूला झाला होता. त्यानंतर आता सीएसकेचे अजून 5 कोचिंग स्टाफमधील सदस्य हे सीएसकेमधून बाहेर पडले आहेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 27, 2026, 06:44 AM IST | Updated: Oct 27, 2026, 07:41 AM IST
Image Credit: CSK च्या कोचिंग स्टाफमधील 5 सदस्यांनी सोडला संघ
Join

IPL 2027 Coaching Staff Change : आयपीएल 2027 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झाला आहे. सोमवारी 26 ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझीने सोशल मीडियावर कोचिंग स्टाफमधील 5 सदस्य हे वेगळे होत असल्याची माहिती शेअर केली. ज्यात बॅटिंग कोच मायकल हसीचा सुद्धा समावेश होता. यापूर्वी 2026 सीजननंतर सीएसकेचा हेड कोच असलेला स्टीफन फ्लेमिंग याने सुद्धा आपले पद सोडले होते आणि संघापासून वेगळा झाला. त्यानंतर जहीर खान याला चेन्नई सुपरकिंग्सने मुख्य हेड कोच म्हणून नियुक्त केलं.

17 वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच असणाऱ्या स्टीफन फ्लेमिंगनंतर आता सपोर्ट स्टाफमधील अजून 5 दिग्गजांनी संघ सोडला आहे. मायकेल हसीचे आभार मानत त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. '2008 मधील पहिल्या हंगामापासून, तुम्ही चेन्नई सुपर किंग्स कुटुंबाचा एक अविभाज्य भाग राहिला आहात'. पुढे सीएसकेने म्हंटलं की, 'पिवळ्या जर्सीमधील तुमचा प्रवास केवळ तुम्ही काढलेल्या धावा किंवा तुम्ही घडवलेल्या खेळाडूंमुळेच नाही, तर अनेक वर्षांपासून या फ्रँचायझीसाठी तुम्ही दाखवलेली निष्ठा, नम्रता आणि अटळ वचनबद्धतेमुळेही ओळखला जाईल. आमच्या इतिहासात तुमचे स्थान नेहमीच खास असेल, थाला!'

गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमंड्स यांच्यासाठीच्या लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 'एरिक सायमंड्स, जे 2018 पासून चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग सेटअपचा एक अविभाज्य भाग राहिले आहेत, त्यांनी आमच्या गोलंदाजी विभागाला घडवण्यात आणि गेल्या काही वर्षांत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. तुमच्या समर्पित सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद, एरिक सिमन्स. तुमच्या भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा'. विशेष म्हणजे, आगामी हंगामात मोहित शर्मा संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.

 

  संघाचा माजी सहाय्यक कोच असणाऱ्या राजीव कुमारबाबत पोस्ट करत सीएसकेने लिहिले की, 'चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग टीममधील एक महत्त्वाचे सदस्य म्हणून, राजीव कुमार यांनी गेल्या काही वर्षांत संघाची तयारी, विकास आणि कामगिरी यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. खेळाडूंसोबत जवळून काम करणे, आपले कौशल्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि संघाचा पाया अधिक भक्कम करणे, या गोष्टी आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग राहिल्या आहेत. धन्यवाद, राजीव कुमार! भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा'.
 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES