मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय, 'या' संघाला ठोकला रामराम
Kieron Pollard : मुंबई इंडियन्स संघाचा हेड कोच झाल्यावर 39 वर्षीय कायरन पोलार्डने आता साउथ आफ्रिका लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्स या चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Kieron Pollard : आयपीएल 2026 नंतर महेला जयवर्धनेनं मुंबई इंडियन्सचं हेड कोचपद सोडलं. त्यानंतर आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्स संघाने 16 वर्षांपासून त्यांच्या संघाचा भाग असलेल्या कायरन पोलार्ड याच्यावर हेड कोच पदाची जबाबदारी सोपवली. कायरन पोलार्ड याला मुंबई इंडियन्सने हेड कोच बनवलं असलं तरी वेस्ट इंडिजचा हा 39 वर्षीय खेळाडू इतर परदेशी लीगमध्ये खेळाडू म्हणून खेळतो. मुंबई संघाचा हेड कोच झाल्यावर पोलार्डने आता साउथ अफ्रीकी लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्स या चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीमधून बाहेर पडला आहे.
मुंबई इंडियन्सने हेड कोच पदाची दिली संधी :
महेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्सच्या हेड कोच पदावरून बाजूला झाल्यावर हे पद काही दिवसांपासून रिक्त होते. नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आयपीएल फ्रेंचायझींना आयपीएल 2027 साठी त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात सुद्धा आयपीएल 2027 चं मिनी ऑक्शन पार पडेल. त्यासाठी मुंबई इंडियन्सला खेळाडूंची निवड करावी लागेल. जवळपास 16 वर्षांपासून कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याची सुरुवात ही संघात खेळाडू पासून झाली होती, तर 2022 मध्ये त्याने आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो फलंदाजी कोच म्हणून मुंबई इंडियन्समध्ये रुजू झाला. त्यानंतर आता पोलार्डला थेट हेड कोच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, किती वाजता सुरु होणार सामना? पाहा संपूर्ण डिटेल्स
जोबर्ग सुपर किंग्सची सोडली साथ :
पोलार्डने मुंबई इंडियन्समध्ये हेड कोच पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर साउथ अफ्रीकी लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्सची साथ सोडली आहे. जोबर्ग सुपर किंग्स हा संघ चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीचा भाग आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर पोलार्डने जोबर्ग सुपर किंग्सशी जी चेन्नई सुपर किंग्सशी संबंधित SA20 फ्रँचायझी आहे आपले संबंध तोडले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगमध्ये, जोबर्ग सुपर किंग्सने पोलार्डला 1.5 मिलियन रँड देऊन आपल्या संघात सामील केले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलार्ड पहिल्यांदाच या संघाचा भाग बनला आहे. मात्र सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, पोलार्डने त्यांना कळवले आहे की तो 2027 च्या SA20 स्पर्धेत जोबर्गसाठी खेळू शकणार नाही. त्यामुळे आता संघ एका नवीन खेळाडूचा शोध घेणार आहे.