Amit Mishra On Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा माजी लेग स्पिनर असलेल्या अमित मिश्राने माजी कर्णधार विराट कोहलीवर गंभीर आरोप केले आहेत. अमित मिश्रणे त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात येण्यासाठी आणि टीम इंडियात पुनरागमन न झाल्याप्रकरणी विराट कोहलीला जबाबदार ठरवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाश चोपडाशी बोलताना अमित मिश्राने दावा केला की दुखापत झाल्यावर त्याला संघात परत घेण्यात येईल असा विश्वास देण्यात आलेला. मात्र अमित पूर्णपणे फिट झालेला असताना सुद्धा त्याला पुन्हा भारतीय संघात संधी देण्यात आली नाही. अमित मिश्राच्या सांगण्यानुसार विराट कोहलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला, परंतू त्याला कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालं नाही.
एका ओव्हरमध्ये 5 विकेट :
आकाश चोप्राशी मुलाखतीत बोलताना अमित मिश्राने त्याच्या अमित मिश्राने आपल्या कारकिर्दीतील अशा एका टप्प्याची आठवण सांगितली, जेव्हा ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. 2016 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये त्याने अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली. त्यांनी या पाच सामन्यांत एकूण 15 विकेट मिळवले आणि त्यांना प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आले.
29 ऑक्टोबर 2016 रोजी विसशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या पाचव्या निर्णायक वनडे सामन्यात अमित मिश्राने फक्त 18 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. भारताने न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत करून सीरिज 3-2 ने आपल्या नावावर केली. त्या सामन्यात मिश्राला प्लेअर ऑफ द मॅच म्हणूनही घोषित करण्यात आले होते. मात्र एवढी प्रभावी कामगिरी करूनही अमित मिश्राची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार पुढे जाऊ शकली नाही. दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्यानंतर, त्याला पुन्हा भारतीय संघात आपले स्थान मिळवता आले नाही.
विराटवर केले गंभीर आरोप :
आकाश चोपडाशी बोलताना गोलंदाज अमित मिश्राने त्याला कमबॅकची संधी न मिळाल्याने निराशा व्यक्त केली. अमित मिश्राच्या सांगण्यानुसार अमित जेव्हा दुखापतग्रस्त होता तेव्हा विराट कोहली हा टीम इंडियाचा कर्णधार होता. त्याने असा दावा केला की कोहलीने त्याला पुनरागमनाबाबत खात्री दिली होती. मिश्राने सांगितले की, दुखापत झाल्यानंतर त्याने सातत्याने आपल्या फिटनेसवर काम केले आणि रिहॅबिलिटेशन पूर्ण केली. पुन्हा खेळण्यासाठी तंदुरुस्त झाल्यावर त्याने विराट कोहलीशी संपर्क साधला.
अमित मिश्राच्या सांगण्यानुसार विराटने त्याच्याकडून थोडा वेळ मागितला आणि एक आठवड्याच्या आत उत्तर देईन असं सांगितलं. अमित मिश्राच्या म्हणण्यानुसार, एक आठवडा उलटला, त्यानंतर दोन आणि तीन आठवडेही निघून गेले, तरीही अमितला विराटकडून कोणताही फोन आला नाही. त्यानंतर त्याने स्वतःहून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला स्पष्ट उत्तर मिळाले नाही. मिश्रा यांनी सांगितले की, तेव्हा त्यांना जाणीव झाली की आता भारतीय संघात परतण्याची शक्यता जवळपास संपली आहे. त्यानंतर अमितने कोहलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं थांबवलं.
अमित मिश्रा विराटच्या या वागणुकीमुळे नाराज होता, कारण दुखापत होण्यापूर्वी त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. अमितच्या मते एखादा खेळाडू दमदार कामगिरी केल्यानंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला असेल. तर त्याला पुनरागमन करण्याची योग्य संधी दिली गेली पाहिजे.