अनिरुद्धची भविष्यवाणी ठरली खरी! IPL टीमच्या मालकिणीसोबत लवकरच वाजणार शहनाई
सनराइजर्स हैदराबादच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी काव्या मारन नेहमीच स्टेडियममध्ये पाहायला मिळते, आता तिचे लग्नाची घोषणा झाल्यापासून सोशल मिडियावर तिच्या पती कोण आहे तो काय करतो त्यांची लव्ह स्टोरी यासुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे, याचदरम्यान एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या विवाहसोहळ्याची संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरु आहे. मागील काही काळापासून सातत्याने यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या आता मुख्यमंत्र्यांनी त्याच्या लग्नाच्या निमंत्रणाचे काही फोटो शेअर केले आहेत आणि आयपीएलमधील सनराइजर्स हैदराबादच्या संघाची मालकीण काव्या मारनच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काव्या मारन हिचा होणार पती अनिरुद्ध रविचंद्रन हा एक सिनेमा सृष्टीतील एक प्रसिद्ध गायक आहे. सनराइजर्स हैदराबादच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी काव्या मारन नेहमीच स्टेडियममध्ये पाहायला मिळते, आता तिचे लग्नाची घोषणा झाल्यापासून सोशल मिडियावर तिच्या पती कोण आहे तो काय करतो त्यांची लव्ह स्टोरी यासुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे.
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांचे लग्न 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये होणार आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन हे सन टीव्ही आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची कन्या काव्या हिच्याशी विवाहबद्ध होत आहेत. या भव्य विवाह सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना याचदरम्यान एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत होत आहे यामध्ये अनिरुद्धच्या काव्यासोबतच्या लग्नाची भविष्यवाणी अनेक वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. सुमारे १० वर्षे जुनी मानली जाणारी एक क्लिप सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा
काव्या मारन आणि अनिरुद्धच्या लग्नाची तारिख ठरली, मुख्यमंत्र्यांनी केली पोस्ट! जाणून घ्या केव्हा आणि कुठे पार पडणार सोहळा?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक टॅरो वाचक त्या संगीतकाराला सांगत आहे की तो कोणाशी लग्न करेल. एका तमिळ चॅनलवर अनिरुद्धच्या प्रेमजीवनावर चर्चा झाली. लग्नाआधी त्याच्या किती गर्लफ्रेंड्स असतील हे देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आणि त्याचे प्रेमविवाह होईल की ठरवून केलेले लग्न, असे प्रश्न टॅरो वाचकाला विचारण्यात आले. या व्हिडिओमध्ये जेव्हा टॅरो वाचकला प्रश्न केला त्यावेळी टॅरो वाचकने सांगितले की, अनिरुद्धचे लग्न प्रेमविवाह असणार आहे, म्हणजेच तो आधी एका मुलीच्या प्रेमात पडेल आणि नंतर वडिलांची परवानगी घेईल. इतकेच नव्हे तर, ज्योतिषाने अनिरुद्धच्या भावी पत्नीबद्दलही काही तपशील उघड केले.
अनिरुद्धच्या पत्नीबद्दल टॅरो वाचकने सांगितले होते की ती मुलगी सिनेमा सृष्टीमधील नसणार आहे हे आधीच सांगितले होते. अनिरुद्धच्या पत्नीबद्दल असेही सांगितले होते की, ती उच्चशिक्षित असेल आणि बहुधा दूरसंचार किंवा प्रसारण क्षेत्रात काम करेल. ज्योतिषाने अशीही भविष्यवाणी केली होती की ती अनिरुद्धच्या घरापासून एक-दोन किलोमीटरच्या आतच राहील असे सांगितले होते. हा फार जुना व्हिडिओ आहे, 10 वर्ष जुना व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने काही क्षणातच व्हायरल होत आहे.