4,4,4,4,4,4,4,4... पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर आर्यवीर सेहवागने केले खास सेलिब्रेशन! पहा Video
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या फायनलच्या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने अर्धशतक झळकावले यावेळी त्याने खास सेलिब्रेशन केले, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
आशिया कप अंडर 19 फायनलचा सामना खेळवला जात आहे, या सामन्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत 9 विकेट्स गमावून 337 धावा 50 ओव्हरमध्ये केल्या. यामध्ये भारताचा मुख्य गोलंदाज इशान सूद हा फायनलच्या सामन्यामध्ये दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये भारतीय संघाचे फलंदाज आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांनी कमालीची सुरुवात भारताच्या संघाने केली आहे.
आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांनी संघासाठी 15 ओव्हरमध्ये 80 धावांची भागीदारी केली आणि एकही विकेट भारताच्या संघाने गमावलेला नाही. या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवाग एक वेगळ्य अंदाजामध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला भारताचा सलामीवीर फलंदाज आर्यवीर सेहवाग याच्या हातांला जोरदार चेंडू लागला आणि तो मैदानावरच कळवत राहिला. या फायनलच्या सामन्यामध्ये वेदनेने कळवत असलेल्या सेहवागने मैदान सोडले नाही त्यानंतर तो मैदानावरच टिकून राहिला. त्याने या वेदनेमध्ये अर्धशतक झळकावले.
हे ही वाचा
वैभव सूर्यवंशीच्या नावावर नवा विक्रम, ठरला टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार!
आर्यवीर सेहवागने 51 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने याममध्ये 8 चौकार मारले, तो या संपूर्ण आशिया कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यासह तो आता या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीवर अव्वल स्थानावर आहे. आर्यवीर सेहवागची साथ भारतीय संघाचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी चांगली साथ देत आहे. आर्यवीर सेहवागने सेहवागने अर्धशतक फायनलच्या सामन्यामध्ये झळकावल्यानंतर त्याने एक खास सेलिब्रेशन केले. त्याने अर्धशतक झळकावले आणि बॅट उंचावली त्यानंतर त्याने दुसऱ्या हाताने हातवारे केले. सध्या सोशल मिडियावर त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अब्दुल कादिरनेही एक मोठी आणि वादळी अर्धशतकी खेळी केली. कर्णधार फरहान युसूफने ६० चेंडूंमध्ये ६३ धावांची खेळी केली, तर अब्दुल कादिरने ५४ चेंडूंमध्ये ८० धावांची वेगवान खेळी केली. भारताकडून ८ गोलंदाजांनी गोलंदाजी केली, परंतु सुरुवातीच्या टप्प्यात धावा रोखण्यात ते अपयशी ठरले. काव्या पटेलने चार बळी आणि व्यंकटाने ३ बळी घेतले. अर्जुन राजपूतला १ बळी मिळाला. १ फलंदाज धावबाद झाला.