भारत विरुद्ध अफगाणिस्तान अंडर 19 संघामध्ये आशिया कप 2026 सेमीफायनलचा सामना खेळवला जात आहे. आशिया कप अंडर 19 चा पहिला फायनलचा संघ ठरला आहे, पाकिस्तान फायनलचा सामना खेळणार आहे. पाकिस्तानच्या संघाने बांग्लादेशला 9 विकेट्सने पराभूत करुन अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनल 2 सामना हा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे या सामन्यामध्ये वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने पुन्हा एकदा त्यांची क्षमता दाखवली आहे आणि सेमीफायनलमध्ये अर्धशतक झळकावले आहे. या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने कमालीची कामगिरी केली, यूएईविरुद्ध 160 धावांची खेळी खेळल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलच्या नॅाकआऊट सामन्यामध्ये त्याने पुन्हा एकदा दमदार फॅार्म कायम ठेवत अर्धशतक झळकावले आहे. त्याने आजच्या सामन्यामध्ये सुरुवात संथ केली तरीही या सामन्यामध्ये त्याने संघासाठी 57 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. विशेष म्हणजे, आर्यवीरने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. आर्यवीर सेहवाग 19 वर्षांखालील आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये 303 धावा केल्या असून, त्यात 29 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश आहे.
Another milestone, same trademark finish! Aaryavir Sehwag brought up his fifty with a six. Watch #AFGvIND in the DP World Men's U19 Asia Cup, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV https://t.co/iqzisSX78h
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 12, 2026
इतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा कर्णधार मागील दोन सामन्यामध्ये फेल झाला होता पण त्याने या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली. लक्ष्य रायचंदानी यांनी संघासाठी 93 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने 13 चौकार आणि एक षटकार मारला. या सामन्यामध्ये त्याने संघासाठी प्रभावी कामगिरी केली आणि संघाला विजयापर्यत नेण्यात मोलाचे योगदान दिले.
हे ही वाचा
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर दमदार फॅार्ममध्ये असलेला इशान सूद याने आणखी एकदा त्याची कमाल दाखवली आणि उपांत्य फेरीमध्ये त्याने संघासाठी 3 विकेट्स घेतले. आर्यन सवसानी याने संघासाठी 2 विकेट्स घेतले तर यशवर्धन चौहान आणि काव्या पटेल, अर्जुन राजपूत यांनी संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवून दिला.